💥मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे येथे समाज प्रबोधन विद्यालयात संविधान दिन साजरा...!


💥यावेळी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी गावातील चौका चौकांमध्ये पथ नाट्य करून लसीकरण करण्याचे महत्त्व पटवून दिले💥


समाज प्रबोधन विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा शिंदे तालुका मालेगाव येथे 26 नोव्हेंबर 2021 रोजी 72 वा संविधान दिन साजरा करण्यात आला त्या निमित्त करोना या रोगाविषयी जागृती करण्यासाठी व लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खंडाळा गावातून प्रभात फेरी करण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांनी कोरोना विषय नारे देऊन प्रभात फेरी दरम्यान येशील घेण्याबाबत व त्याचे महत्त्व पटवून देण्याची नारे देऊन जनजागृती केली तसेच वर्ग बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी गावातील चौका चौकांमध्ये पथ नाट्य करून लसीकरण करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पूर्ण विषयी जाणीव जागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले त्यानंतर विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सी. उ जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले त्यानंतर प्रमुख उपस्थिती हि.उ अवचार तसेच रा पू पंडित तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ऋषी कुठे व विद्यार्थीनी प्रतिनिधी ऋतुजा इंगोले यांनी व उपस्थित सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारीवृंद  सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले दरम्यान विद्यार्थिनीचे समयोचित भाषणे झाले मध्ये  पल्लवी सरनाईक या विद्यार्थिनी उत्कृष्ट भाषण करून मने जिंकली तसेच स न सोमटकर  सर यांनी सुद्धा भारतीय संविधानावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सि उ जाधव मुख्याध्यापक यांनी भारतीय संविधाना विषयी  संविधान दिनाविषयी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भ ता  साबळे यांनी केले संचालक वि पु लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग तू पांडे सर यांनी केले दरम्यान भारतीय संविधानाच्या संविधानाचे  वाचन व  प्रतिमेचे पूजन केले नंतर  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जाधव सर यांच्या भाषणानंतर असे दोनदा सामूहिक वाचन करण्यात आले कार्यक्रमातील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन ग तू  पांडे यांनी केले  व  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या