💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील सरपंचांना मिळाला राज्यस्तरीय सरपंच सेवा संघाचा आदर्श सरपंच पुरस्कार...!


💥शिवाजीराव साखरेंना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल बुद्ध विहार समितीच्या वतीने करण्यात आला त्यांचा सत्कार💥

पूर्णा (दि.२५ नोव्हेंबर) - तालुक्यातील धनगर टाकळी येथील सरपंच शिवाजीराव साखरे यांना राज्यस्तरीय सरपंच सेवा संघाचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व बुद्ध विहार समिती च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत व सत्कार करण्यात आला.

सरपंच शिवाजीराव साखरे बुद्ध विहारांमध्ये नेहमीकरता भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे वंदन करण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमीच येत असतात. बुद्धविहाराला नियमित दान स्वरूपामध्ये  मदतही करत असतात.धनगर टाकळी च्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत ग्रामीण भागातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.

या सत्कार समारंभ प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे माजी मुख्याध्यापक वा.दे. पाटील ग्रामपंचायत सदस्य अंगद साखरे, चांदु साखरे,ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गायकवाड इंजिनीयर विजय खंडागळे माजी मुख्याध्यापक वामनराव पाटील   सुरज जोंधळे व महिला मंडळाची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या