💥जुनेद खान दुर्राणी यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम....!


💥शिलाई मशीन व पिठाच्या गिरण्यांच्या वाटप या सह विविध समाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले💥

पाथरी / प्रतिनिधी

पाथरी नगर परिषदेचे गट नेते जुनेद खान दुर्राणी यांच्या वाढदिवसा निमित्त शनिवार २० नोव्हेंबर रोजी राविकाँ च्या वतीने ४०० वृक्षांची लागवड करण्यात येणार,विठाई क्लिनिक व यश मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स यांच्या वतीने सर्वरोग निदान शिबीर,आ.बाबाजानी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने शिलाई मशीन व पिठाच्या गिरण्यांच्या वाटप या सह विविध समाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत न.प. गट नेते जुनेद खान दुर्रानी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.या वर्षीही वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वाघाळा -फुलारवाडी रस्त्या लगत चारशे वृक्ष रोपट्यांची लागवड करून जुनेद खान दुर्राणी यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती राविकाँचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे यांनी दिली. तसेच बाबा टावर येथे विठाई क्लिनिक व यश मेडीकल यांच्या वतीने सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते आयुर्वेदाचार्य श्री. ह.भ.प. हनुमंत म.जायेंकर कासापुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या वेळी सत्कारमुर्ती म्हणून जुनैद खान दुर्राणी याची उपस्थिती राहणार आहे. शिबीरास रा कॉ.जेष्ठ नेते अॅड.मुंजाजी भालेपाटील,माजी सभापती दादासाहेब टेंगसे,बाजार समिती सभापती अनिल नखाते, माजी जि.प. सदस्य चक्रधर उगले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे,जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात,बाळासाहेब कोल्हे,राजीव पामे,एकनाथ शिंदे,नारायण आढाव राधाकिशन डुकरे,लहु घांडगे,सतिष चौधरी,विष्णू काळे,किरण घुंबरे अदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या शिबीरात डॉ. सुशिलकुमार शिंदे,डॉ. निवृत्ती पवार,डॉ. राजेंद्र वाकणकर, डॉ. संदीप मस्के,डॉ. गायत्री काकड पाटील,डॉ.पंकज सिवटे,डॉ. गणेश फलके, डॉ. अशोक बन, डॉ. निलेश पवार, डॉ. प्रियंका हाके, डॉ. प्रांजल लिंबगावकर हे विविध आजारावरील तज्ञ डॉक्टर्स रुग्नांची तपासनी करणार आहेत. तर न प ला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून देण्यात महत्वााची कामगिरी केलेल्या १४४  सफाई कामगारांना सुनिल पितळे यांच्या कडून कापडी बुट देण्यात येणार आहेत.तरी या शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घेण्याचे अवाहन शिबीराचे आयोजक अनंत वाकणकर यांनी केले आहे. त्याच बरोबर आ.बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने १०० शिलाई मशीन व ५० पिठाच्या गिरण्यांचे वाटप न.प. गट नेते जुनेद खान दुर्राणी यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.तर सायंकाळच्या सत्रात जिल्हा परिषद मैदानावर  महाराष्टातील सुप्रसिद्ध गायक समि सौदागर प्रस्तुत सुकून बँड ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.महाराष्टातील सुप्रसिद्ध गायिका कलर टीव्ही फेम सिंगर श्रावणी महाजन,  व झी टीव्ही फेम सिंगर मुणवर अली यांच्या मधुर आवाजामध्ये हिवाळ्याच्या गुलाबी थंडी मध्ये पाथरीकरांना मनोरंजन मिळणार आहे तरी या  कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती ऑर्केस्ट्रा आयोजन समिती व जुनेद भैय्या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या