💥राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांतचे माजी संघचालक ॲड.गंगाधरराव (दादा) पवार यांचे निधन....!


💥त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगावी वझुर ता.पूर्णा येथे गुरुवारी १८ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले💥

पूर्णा ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांताचे माजी संघचालक ॲड.गंगाधरराव(दादा)ज्ञानदेव पवार (वय वर्षे ७८) यांचे बुधवारी(१७ नोव्हेंबर) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगावी वझुर (ता.पूर्णा) येथे गुरुवारी १८ नोव्हेंबर  अंत्यसंस्कार करण्यात आले.

पेशाने वकील असलेले गंगाधरराव पवार हे दादा नावाने सर्वपरिचीत होते.सुरुवातीच्या दिवसात त्यांनी शिक्षक म्हणून अंबाजोगाई येथे कर्तव्य बजावले.त्यानंतर त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले.याच दरम्यान त्यांनी भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.त्यानंतर ते परभणी जिल्हा संघचालक म्हणून कार्यरत राहिले.यानंतर त्यांची देवगिरी प्रांत संघचालक म्हणून निवड झाली.देवगिरी प्रांत संघचालक म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम पाहिले.सध्या ते राष्ट्रीय सहकार निगम लिमिटेड,नवी दिल्लीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.याशिवाय ते जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक होते.शेतीमधील नवनवीन प्रयोगामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने 'कृषी भूषण' पुरस्कार देऊन गौरविले आहे.याशिवाय इतर विविध वित्तीय,सामाजिक,सांस्कृतिक संस्थांशी ते निगडित होते.त्यांच्या सुस्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी, उपजिल्हाधिकारी संजय,शास्त्रज्ञ विजय आणि इंजि. धनंजय ही तीन मुले,पुतणे,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या