💥परळी पंचायत समितीच्या नरेगा विभागात मोठा करोडो रूपयांचा भ्रष्टाचार...!


💥तालुक्यातील काही गावात आराखड्यात नोंद नसतांना कामांचे वाटप ; आराखड्यात नोंद असणारे गावे मात्र वंचित💥 

💥करोडो रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करा💥

💥जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल💥

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरेगा विभागात मजुरीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. तसेच तालुक्यातील अनेक गावात कृती आराखडा मध्ये कामांचा उल्लेख नसतांना कामांचे वाटप करून शासनाच्या करोडो रूपयांचा निधीची अफरातफर करण्यात आली आहे. तसेच आराखड्यात मध्ये नोंद असणाऱ्या गावांना मात्र वंचित ठेवले आहे. तसेच गावातील सार्वजनिक कामामध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे तक्रार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकानिवेदनाव्दारे करण्यात आली आहे. तसेच दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून संबधित गुन्हे नोंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.  नरेगा विभागातील झालेल्या करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करा, निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

      दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील परळी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ९० गावांमधील काही गावात नरेगा अंतर्गत केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आराखड्यात नोंद नसता कामे देण्यात आली आहेत. तसेच आराखडा नोंद नसतांना कामे दिलीच कशी या सर्व कामांची जिल्हा परिषद विभागाने चौकशी करून काही गावातील ग्रामपंचायतकडून या सर्व कामांची रिकव्हरी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. वैयक्तिक कामांमध्ये सुधा भ्रष्टाचार झाला आहे. त्या लाभार्थ्यांवर नोटीस काढून कारवाई करण्यात यावी तसेच सन २०१९-२० व २०२०-२१ काळात झालेल्या कामामध्ये मोठा गैरकारभार सुरू आहे.शासनाच्या कृती आराखड्यात प्रमाणे परळी पंचायत समितीमध्ये कामांचा समतोल न राखता काही ग्रामपंचायतींना जास्तीचे काम देण्यात आले.तसेच, कोणतेच काम ईस्टिमेट प्रमाणे झालेले नाही.परळी पंचायत समितीमध्ये नमुना नंबर ४ मध्ये मागणी नसताना व मजुरांची बेकायदेशीर नोंदणी करून पैसे लाटले आहेत.मजूर कामावर नसतांना ही त्यांच्या नावावर पैसे उकळले आहेत.रोजगार हमी रजिस्टर मजूर कामगार नसतांना रजिस्टर पूर्ण करून, त्यांच्या खात्यावर पैसे कसे जातात? यामध्ये गँबियन बंधारे, सिंचन विहीर,गाय गोठा इ.कामांचा आराखड्यानुसार समतोल न राखता देण्यात आले आहेत.वरील बोगस आणि भ्रष्ट कामांची चोकशी करावी.मजूर कामावर नसतांना ही उचलाला जातो लाखोंचा निधी.त्याशिवाय कुठल्याही कामाचे बिल देऊ नये.करिता शासनाने कुठलेही बिल अदा करू नये.अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी ,जिल्हा परिषद, बीड यांना देण्यात आले आहे.निवेदनावर मुंडे सचिन भगवानराव, शीतलदास श्रीराम आरसुळे, मधुसूदन  नारायण होळंबे ,भरत ज्ञानोबा शिंदे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच तालुक्यातील झालेल्या करोडो रूपयांचा निधीच्या घोळ करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर  गुन्हा दाखल करावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या