💥पुर्णा तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत घोळ ; मंजूर विहिरी कागदोपत्रीच...!


💥आलेगाव सवराते गावात विहीरीचे खोदकाम न करताच रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण निधी उचलून केला अपहार💥

पूर्णा (दि.२३ नोव्हेंबर) - तालूक्यातील अनेक गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींचे अनुदान संबंधित गावांतील ग्रामविकास अधिकारी सरपंच व पंचायत समिती मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून योजनेतील लाभार्थ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत कागदोपत्री विहिरींची कामे झाल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची प्रत्यक्ष चौकशी केल्यास या 'योजनेत घोळ की घोळात योजना ?' याचा उलगडा होईल.


असाच एक गंभीर प्रकार तालुक्यातील आलेगाव सवराते गावात झाल्याचे उघडकीस आले असून येथील एका शेतकऱ्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतात विहीर मंजूर झाली होती. परंतु सबंधित शेतकऱ्याने रोजगार सेवक,ग्रामसेवक,रोजगार,अभियंता यांच्याशी संगनमत करुन विहीरीचे खोदकाम, बांधकाम न करता खोटे मोजमाप पुस्तीका (एम बी रेकॉर्ड) तयार करुन संपूर्ण मंजूर निधी रक्कम उचलून गिळकृत करीत शासनाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार काल मंगळवार दि.२२ नोव्हेंबर २०२१ रोजी गटविकास अधिकारी पूर्णा यांच्याकडे येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगदीश्वर खरे यांनी केली असून फसवणूकीचा फौजदारी गुन्हा दाखल करुन अपहारातील रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच तहसीलदार पल्लवी टेमकर व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे सुध्दा लेखी स्वरूपात तक्रार करण्यात येणार आहे. 

या विषयी सविस्तर तक्रार वृत्त असे की, आलेगाव येथील शेतकरी विश्वनाथ देवराव सवराते यांची भुमापन क्रमांक २४७ मध्ये एकूण १ हेक्टर २२ आर जमीन आहे. त्या गटात नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यात आला. त्यामुळे त्यांना मंजुरी मिळाली. परंतु विहीर खोदलीच नाही. उलट सबंधित कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन बिल उचलेले. शासनाची फसवणूक केली. मंजूर झालेला १६८०६०/रुपये निधी हडप केला. यात कामाचा मंजुरी क्रमांक १८१७००८/२०२०-२०२१/३७७६८/ ए. एस. मंजूर दि. ७/१२/२०२० पं. स. पूर्णा असून सांकेतांक क्रमांक १८१७००८०१९/आय एफ/१२३४९८०२१० आहे. सदरील प्रकरणात सबंधित जबाबदार अधिकारी यांनी जाय मोक्यावर जाऊन पाहणी करुन चौकशी करावी. दोषी अढळताच सबंधित  सर्व अपहार कर्त्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांच्या विरुद्ध भादवी प्रमाणे ५२०,४६८,४६७,४१७,१२०-ब अन्वे गुन्हा दाखल करुन रक्कम वसूल करण्याचे तक्रारदार शिवाजी जगदीश्वर खरे यांनी नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या