💥जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची सदिच्छा भेट...!


💥महाविद्यालयाच्या वतीने परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यांचा सत्कार💥

परळी/ प्रतिनिधी

वसंतराव नाईक शिक्षण संस्था संचलित जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री.डॉ. प्रमोद येवले  यांनी सदिच्छा भेट दिली.

  महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा . विजय मुंडे यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.डी मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. माधव रोडे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

 डॉ प्रमोद येवले सर यांनी महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालयाची गुणवत्ता, भौतिक सुविधा ,विद्यार्थी संख्या, तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांच्या विषयी माहिती घेतली यावेळी  महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या