💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ.....!


💥पेरलेला हरभरा,गहू राण डुकर पहाता पहाता करीत आहेत फस्त ; परिसरातील शेतकरी हैराण💥

प्रतिनिधी ;-

 पुर्णा ; तालुक्यातील धानोरा काळे शेत शिवारात सध्या रब्बी पेरणी आटोपती आली आहे परंतु पेरलेले हरभरा,ज्वारी,गहू  रानडुकरे रात्रीलाच फस्त करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत याकडे वनविभागाने तात्काळ लक्ष देत बंदोबस्त करणे गरजेचे आहे.


पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे शिवारातील गोदावरी गंगा तुडुंब भरलेली आहे या गंगेवर मोटार पाइप लाइन द्वारे बागायती पिके घेतली जातात त्यात ऊस,फळबाग,कापूस,हळद तर रब्बीत गहू,हरभरा,ज्वारी आदी पेरणी रब्बी हंगामात झाली आसून विविध संकटाचा सामना करत शेतकरी सामोरे जात आहेत परंतु रब्बी त पेरणी केलेले बियाणे व उभे असलेले पीक  रात्री अवेळी रानडुकरांचा  मोठा कळप येत  पेरलेले शेतच फस्त करत असल्याने पेरलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी  अंधाऱ्या रात्रीला रात्र  रात्र जागून काढत विविध उपाय योजना करत आहेत तरी  त्याचा फायदा होताना दिसत नसल्याचे बोलल्या जात आहे  आदीच खरिपातील पीक गेले तर एकीकडे  रब्बीत पेरणी केलेले बीयाने व उभे असलेले पीक रानडुकरे फस्त करत असल्याने धानोरा काळे सह मुबर, गोळेगाव,देऊळगाव, कळगाव, बानेगाव आदी शिवारातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे तरी वनविभागाणे तात्काळ लक्ष देऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

_________________________________________________

रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शेतातील पिके उपटून  मोठ्याप्रमाणात नासधूस करून पूर्णतः उध्वस्त करत आहेत.पिकाच्या संवरक्षनासाठी,तार,जाळे,साड्या लावून मोठा खर्च करत आहोत तरी ही अचानकच रात्री ला रानडुकरे पिकाचे नुकसान करत असल्याने हतबल झालो आहे. खरिपातील पिके आत्तिवृष्टीने गेले आता रब्बीची पिके रानडुक्कर उध्वस्त करत आहेत.याकडे वनविभाग लक्ष देऊन बंदोबस्त करावा.

योगेश नामदेवराव काळे,धानोरा काळे (ता.पूर्णा)

बागायतदार शेतकरी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या