💥परदेशातून आलेल्या नागरिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आवाहन....!


💥जिल्‍हाधिकारी कार्यालयातील आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभागात  नोंदणी करण्याचे आवाहन💥

परभणी :- कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन हा विषाणू डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने पसरणारा असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य विभागाने स्पष्ट केले आहे.  त्‍यामुळे नेदरलॅड, बेल्जियम, झेकरिपब्‍लीक, ब्रिटन, जर्मनी, इटली, इस्राईल, हॉगकॉग, बोस्‍टवाना व दक्षिण अफ्रिका या दहा देशातुन किंवा त्या मार्गे इतर देशातून परभणी जिल्ह्यात  दि.१५ ते दि.२९ नोव्हेंबर २०२१ दरम्‍यान आलेल्‍या नागरिकांनी स्‍वतःची व आपल्‍या कुटूंबातील आलेल्‍या सदस्‍यांची परभणी येथील जिल्‍हा सामान्‍य

रुग्‍णालयात  अथवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभागात  नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

      परभणी जिल्‍हयात कोरोना रुग्णसंख्या कमी प्रमाणात असल्याने यापुर्वी जिल्‍हावासियांना कोरोना निर्बंधातून सूट देण्‍यात आली आहे. केंद्र शासनाच्‍या आरोग्‍य विभागाने कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन हा विषाणू नेदरलॅड, बेल्जियम, झेकरिपब्‍लीक, ब्रिटन, जर्मनी, इटली, इस्राईल, हॉंगकॉंग, बोस्‍टवाना व दक्षिण अफ्रिका या दहा देशामध्‍ये बाधीत रुग्‍ण आढळून आले असल्‍याचे निदर्शनास आणून दिले आहे. तरी या 10 देशातुन येणाऱ्या प्रवाशांच्या किंवा त्या मार्गे इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसेच मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील या संदर्भात दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  खबरदारी घेण्‍याचे स्‍पष्‍ट निर्देश दिले आहेत. असेही कळविण्यात आले आहे..,,..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या