💥मुंबई येथे डॉ.संतोष मुंडे यांच्या वतीने आरोग्य विभागाच्या संचालकपदावर निवडीबद्दल डॉ.सुनील गित्ते यांचा सत्कार...!


💥डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नंदागौळ येथील डॉ. सुनील गित्ते यांची नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. 

         तालुक्यातील नंदागौळ येथील डॉ.सुनील विलासराव गित्ते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नियुक्त झालेले अधिकारी असून त्यांनी यापूर्वी छतीसगड राज्यात आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक तसेच निर्माण भवन,नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य विभागात सहाय्यक महानिदेशक म्हणून प्रभावीपणे काम केलेले आहे,या कार्याची दखल घेत केंद्रशासनाने त्यांची मुंबई येथे राष्ट्रीय राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्थेत संचालक या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली असून,त्यांची निवड झाल्यामुळे नंदागौळसह बीड जिल्ह्याचा एक भूमीपुत्र एका महत्वाचा पदावर आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. आज शनिवार, दि.20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने डॉ. सुनिल गित्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संतोष मुंडे यांच्यासह इतर उपस्थित होते. डॉ. संनिल गित्ते यांची संचालक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या