💥परळी तालुक्यात 5415 नागरिकांचे कोवीड लसीकरण....!


💥लसीकरण मोहीम आपल्या दारी अंतर्गत परळी तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हयात आज रविवार,दि.28 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या वतिने लसीकरण मोहिम आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत आज विशेष कोवीड लसीकरण उपक्रम राबविण्यात आली.जिल्हयातील बीड तालुक्यात 5836 सर्वाधिक तर दुसऱ्या क्रमांकावर परळी तालुक्यात 5415 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. तहसीलदार सुरेश शेजुळ,गट विकास अधिकारी संजय केंद्रे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,गट शिक्षण अधिकारी सोनवणे व महिला बालविकास अधिकारी रोडे मॕडम यांच्या नियोजनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांच्या आरोग्य विभागाच्या वतिने परळी शहर व तालुक्यात विशेष कोवीड लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील 25 गावात व शहरात आरोग्य विभागाच्या 10 टिम मार्फत नागरिकांना लसीकरणा करिता जनजागृती व प्रर्वत करत एकाच दिवशी तब्बल 5415 नागरिकांचे कोवीड लसीकरण करण्यात आले. शहर व तालुक्यातील नागरिकांना कोवीशिल्ड लसीचा पहिला डोस 2760 तर दुसरा डोस 1826 देण्यात आला असुन कोव्हॕक्सिन लसीचा पहिला डोस 568 तर दुसरा 261 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या विशेष लसीकरण मोहिमेत वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक,सेविका,गट प्रवर्तक,आशा वर्कर्स,आरोग्य सहाय्यक,सहाय्यीका,तलाठी,ग्रामसेवक अदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी याकामी प्रचंड मेहनत घेतली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या