💥मराठी पत्रकार परिषदेच्या 3 डिसेंबर रोजी स्थापना दिनी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करा...!


💥मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन💥 

✍️ मोहन चौकेकर

पुणे - येणाऱ्या 3 डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस असून या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पत्रकार संघांनी डॉक्टरांच्या व आरोग्य विभागाच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिर घेऊन पत्रकारांची आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.

मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, 3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली असून येत्या शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी स्थापनेला 82 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी या दिवशी मराठी पत्रकार परिषद व संलग्न जिल्हा, तालुका पत्रकार संघ विविध उपक्रम राबवून ‘मराठी पत्रकार परिषद दिन’ स्मरण म्हणून साजरा करीत असतात. यावर्षीही परिषदेशी संलग्न असलेल्या बहुसंख्य जिल्हा व तालुका संघांनी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराची यापूर्वीच जय्यत तयारी केली असून पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अशा उपक्रमशील जिल्हा व तालुका पत्रकार संघांचे  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी,सचिव बापूसाहेब गोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवीताई पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या