💥रिसोड तालुक्यातील सवड येथील शासकीय वसतीगृह प्रवेश 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविले....!

💥वसतीगृहाच्या शैक्षणिक वर्ष सन 2021-22 या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम: सामजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंर्तगत चालविण्यात येणाऱ्या रिसोड तालुक्यातील सवड येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे वसतीगृहाच्या शैक्षणिक वर्ष सन 2021-22 या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षीत टक्केवारीनुसार समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, आर्थिकदृष्टया तसेच इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र आहे. शालेय विभागातील इयत्ता 8 वी ते 10 वी,  कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायीक महाविद्यालय व व्यावसायीक महाविद्यालयातील प्रथम वर्षातील प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज भरण्यास पात्र आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर असून प्रवेश अर्ज विनामुल्य वसतीगृहात उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परिपुर्ण भरलेले अर्ज सादर करावे. असे सवड येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या