💥परभणी रेल्वे स्थानकावर आज 25/11 रोजी मराठवाडा प्रवासी महासंघाच्या वतीने "घंटानाद आंदोलन"....!


💥रेल्वे प्रशासनाने लॉकडाऊन नंतर परभणी-मनमाड मार्गावरील अद्यापही सात गाड्या सुरू केल्या नाहीत💥   


          
परभणी (दि.२५ नोव्हेंबर) - मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यावर सतत अन्याय करणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांना जाग यावी तसेच परभणी - मनमाड मार्गावरील अजूनही सुरू न केलेल्या सहा रेल्वे तात्काळ सुरु कराव्यात ता मागणी साठी आज दि 25 नोव्हेंबर 21 रोजी सकाळी 11 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे ने सतत मराठवाडयातील प्रवाश्यावर अन्याय केला आहे. प्रकल्प पूर्ण करणे असो की नवीन रेल्वे सुरू करणे या कडे दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊन नंतर परभणी-मनमाड मार्गावरील अद्यापही सात गाड्या सुरू केल्या नाहीत या बाबत प्रवासी महासंघाने आवाज उठवला आंदोलनाची धमकी दिल्यानंतर काल नांदेड़-मनमाड सुरू करण्याची घोषणा केली.


परंतु अजूनही सहा गाड्या बंद आहेत. त्यासाठी अधिकारयांना जाग यावी म्हणून आज घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. आज सकाळी अकरा वाजता रेल्वे स्थानकावर घंटानाद आणि निदेर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात सर्व सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, सर्व राजकीय पक्ष, सर्व क्षेत्रातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, राजेंद्र मुंढे, कदिरलाला हाश्मी, बाळासाहेब देशमुख, प्रवीण थानवी, डॉ राजगोपाल कलानी, श्रीकांत गडापा , वसंत लंगोटे, रवींद्र मुथा, दयानंद दीक्षित,विजय दराडे श्रीधर ठाकूर, श्रीकांत अंबुरे,महेश पाटील,अरुण पवार आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या