💥पुर्णा तालुक्यातील दबंग भाजप नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालासाहेब देसाई करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश...!


💥भाजपच्या आजी/माजी आमदारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून घेतला पक्षांतर करण्याचा निर्णय💥

पूर्णा (दि.१५ आक्टोंबर) - तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे दबंग लोकप्रिय नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील विस वर्षापासून भगवा भडकवत सभापती पदावर विराजमान असलेले बालाजी रामराव देसाई यांनी आज दि.१५ आक्टोंबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर भाजपा नेत्यांच्या अहंकारी प्रवृत्तीला तिलांजली देऊन भारतीय जनता पक्षाला कायमचा राम..राम...ठोकत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय जाहिर करीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलवलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने भारतीय जनता पार्टीच्या गोटात अक्षरशः खळबळ माजली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून जाणून बुजून हेतूपुरस्सर त्रास दिला जात असल्याचे सांगितले आमदार मेघना बोर्डीकर आणि मा.आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडून माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलतांना श्री. देसाई म्हणाले की मी मूळचा शिवसैनिक होतो काही वादामुळे मी भाजप मध्ये प्रवेश केला होता परंतू भाजपच्या नेत्यांनी माझी वेळोवेळी मुद्दाम अडवणूक करून मला वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठबळामुळे मी आजही जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे, खासदार संजय उर्फ बंडू जाधव,जिल्हाप्रमुख विशाल कदम,आमदार राहुल पाटील, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी मला वारंवार सहकार्य केलं आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, या नंतर खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.लवकरच मा.मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, तालुक्यातील अनेक सेवा सोसायटी चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदीसह असंख्य कार्कर्त्यांची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या