💥किरीट सोमंय्यांनी केलेले आरोप खोटे ; सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार : हसन मुश्रीफ


💥सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे केले होते आरोप💥

कोल्हापूर : भाजप नेते यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे असून मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांचा तीव्र निषेध करतो अशा शब्दात स्पष्टीकरण देत ग्रामविकास मंत्री यांनी आरोप करणारे किरीट सोमय्या यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

हसन मुश्रीफ म्हणाले की मी गेली १७ वर्षे मंत्री असून अजूनही माझ्यावर कोणताही आरोप झालेला नाही, असे सांगत येत्या दोन आठवड्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. बिनबुडाचे आरोप करणे ही सोमय्यांची सवय आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असे सांगत किरीट सोमय्या यांची सीए पदवी तरी खरी आहे का याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे मुश्रीफ म्हणाले. सोमय्या दाखवत असलेली सर्व कागदपत्रे ही इंटरनेटवर उपलब्ध असून ती कागदपत्रे आम्हीच अपलोड केलेली आहे. जर ते सर्व खोटे असते तर आम्हीच ती कागदपत्रे कशी अपलोड केली असती, असे मुश्रीफ म्हणाले. शिवाय निवडणुकीची प्रतिज्ञापत्रे देखील नेटवर उपलब्ध असतात. त्यामुळे सोमय्या यांनी कागदपत्रे गोळाकरून करून आपण काही नवीन करत आहोत अशी राणा भीमदेवी थाटात जे आरोप केले त्यात काही तथ्य नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केला, एफआयआर दाखल करणार' ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एका कामात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केला आहे. त्या प्रकरणी आपण लवकरच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, अशी घोषणाही हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या