💥पुर्णा न.प.प्रशासनाचा 'काम सरो वैद्य मरो' कारभार स्वच्छता विभागातील कंत्राटी महिला कामगारांना दाखवला घरचा रस्ता...!


💥कोरोना महामारीत कर्तव्य बजावलेल्या महिला कामगारांवर जाणीवपूर्वक केला अन्याय ; महिला कामगारावर उपासमारीची वेळ💥

पुर्णा (दि.०६ सप्टेंबर) - पुर्णा नगर परिषदेचा 'काम सरो वैद्य मरो' कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीच्या काळात आपल्या स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या जिवाचीही पर्वा न करता स्वच्छता विभागात जिवतोड मेहनत करून शहरातील स्वच्छता मोहिम राबवत सेवा देणाऱ्या कंत्राटी महिला कामगारांना कोरोना महामारीचे प्रमाण कमी होताच मागील एक वर्षापासून घरचा रस्ता दाखवत त्यांच्यावर अन्याय करण्याचे महापाप नगर परिषद प्रशासानाने केल्याने या महिला कामगारांसह शहरवासीयांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.

 कोरोना महामारी सारख्या भयंकर अस्सल कोरोना योध्दा म्हणून शहरातील स्वच्छता विभागात जिवावर उध्दार होत कार्यरत राहून शहरातील स्वच्छतेची जवाबदारी पार पाडणाऱ्या या कोविड योध्द्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. देशात कोरोना महामारीने थैमान घातले असताना आपल्या जीवाची पर्वा न बाळगता नगर परिषदे मार्फत कंत्राटी पद्धतीने सेवा देण्याचे काम या कंत्राटी महिला कामगारांनी केले आहे अश्या या महिला कामगारांवर नगर परिषदेकडून झालेला अन्याय मुख्याधिकारी निलेश तुंगेगेवाडवाड यांनी बंद पडलेले कंत्राट पुन्हा सुरू करून कंत्राटी महिला कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे व त्यांच्यावरील होणार अन्याय दुर करावा अश्या मागणीचे निवेदन युवक नेते रवी विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड,आनंद वाहिवळ,शेख अक्रम,अशोक वाघमारे,महेंद्र गायकवाड यांच्यासह तब्बल पंचवीस ते तिस कंत्राटी महिला कामगारांनी दिले आहे.

या निवेदनावर नगर परिषद प्रशासन व मुख्याधिकारी तुंगेवाड काय निर्णय घेतात याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले असून या निवेदनावर अठ्ठावीस कामगारांच्या स्वाक्षरी आहेत...   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या