💥परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आयडीया-एअरटेल इंटरनेटची गभीर समस्या ; पुर्णा तालुका आघाडीवर...!


💥अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रारी अर्ज करण्यास अनंत अडचणी 💥

- चौधरी दिनेश -वृत्त विशेष

परभणी ; परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सिम कंपन्यांची इंटरनेट सेवा कोलमडत असून यात आयडीया-ओडाफोनसह बिएसएनएल,जीओ वेळोवेळी तर एअरटेल कधीमधी इंटरनेट धारकांना इंटरनेट सेवा सुरळीतपणे पुरवण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे ऑनलाइन बँकींगसह अन्य व्यवहार ऑनलाइन करणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यामुळे संबंधित कंपन्यांची सिमकार्ड धारकांची सिमकार्ड धारक ग्राहकांची आर्थिक पिळवणूक व मानसिक छळवणूक होत असल्याचे दिसत असून यात पुर्णा तालुका आघाडीवर आहे.

 भारत दुरसंचार विभागाच्या 'बिएसएनएल' लाँगफाम तर 'बहोत सताता नही लगता' बिएसएनएल सिमकार्ड कार्ड धारकांनी यापुर्वीच ठवलला असून बिएसएलच्या कोलमडलेल्या सेवेला त्रस्त होऊन अनेक सिमकार्ड धारकांनी आपला मोर्चा आयडीया-ओडाफोन,एअरटेलसह मोदी मेहरबान असलेल्या रिलायंन्सच्या जीओकडे वळवला होता परंतु मोदींच्या 'अच्छे दिन' प्रमाणे जीओची इंटरनेट सेवाही फसवी ठरल्याने जीओ सिमकार्ड धारकांचा भ्रमनिराश झाला यानंतर अनेकांनी पुर्वी सुरळीत इंटरनेट सेवा देणाऱ्या 'आयडीया-ओडाफोन' कडे आपला मोर्चा वळवला परंतू आयडीया-ओडाफोन या कंपनीची इंटरनेट सेवा नेमकी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले व आपल्या शेतातीला संपूर्ण पिक गमावून बसलेले शेतकरी पिक विमा संदर्भात ऑनलाइन तक्रार अर्ज करण्याच्या वेळेवरच मागील दि.०९ सप्टेंबर ते आज पावेतो शनिवार दि.११ सप्टेंबर २०२१ पर्यंत कोलमडल्याने पुर्णा तालुक्यासह अनेक शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले असून अगोदरच आसमानी संकटात सापडलेला अन्नदाता शेतकऱ्यांवर संबंधित कंपन्यांच्या कोलमडलेल्या इंटरनेट सेवे मुळे देशोधडीला लागायची वेळ आली असून पंतप्रधान मोदींची ऑनलाइन सेवा त्यांच्या प्रमाणेच फसवी ठरत असून विमा कंपन्या नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता वर्तवली जात असून शेतकऱ्यांवरील ऐन संकटाच्या काळात तिन तिन चार चार दिवस आमडीया-ओडाफोनसह अन्य सिम कंपन्यांची इंटरनेट सेवा कोलमडत असल्याने पिक विमा कंपन्यांच्या इशाऱ्यावर तर इंटरनेट सेवा विस्कळीत केली जात नसेल ना ? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत असून विस्कळीत झालेल्या इंटरनेट सेवेमुळे ऑनलाइन बँकींग सेवेचाही अक्षरशः फज्जा उडत असून इंटरनेट सेवेच्या नावावर सर्वसामान्य ग्राहक वर्गाची आर्थिक पिळवणूक व मानसिक छळवणूक करणाऱ्या अनियंत्रित झालेल्या सिमकार्ड कंपन्यांवर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पावल उचलावी अशी मागणी जनसामान्यांसह इंटरनेट धारकांकडून होत आहे....   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या