💥पुर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे ऑफलाइन अर्ज देणाऱ्या शेतकऱ्यांना अर्जावर शिक्का देण्यास नकार....!


💥शिक्का देण्यास नकार देणाऱ्या विमा कंपणीसह कर्मचाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण💥 

पूर्णा (दि.१० सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यात दि.६ सप्टेंबर व ०७ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऑनलाइन पिक नुकसानी संदर्भातील अर्ज करतांना इंटरनेटमधील सातत्याने होत असलेल्या बिघाडा मुळे शेतकऱ्यांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागत असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या झालेल्या नुकसानीच्या पंचणामा संदर्भातील अर्ज तालुका कृषी विभागा मार्फत ऑफलाइन करीत असतांना मात्र या ठिकाणी उपस्थित विमा कंपनी कर्मचारी व समवेत तालुका कृषि कार्यालय कर्मचारी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्जावर सही शिक्का तसेच पोचपावती म्हणजे रिसीव्हड देत नसून पोचपावती मागितली असता विमा कंपनी कर्मचारी स्पष्टपणे सांगत आहे की विमा कंपनीने स्टॅम्प देण्यासाठी प्रोव्हाइड केला नसल्याचे आमच्याकडे शिक्का दिले नसल्याचे व फक्त सही करून पोचपावती देण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट बोलण्यातून सांगितले त्यावेळी समवेत असलेल्या कृषी कर्मचारी यांनी ही सर्व कागदपत्रे विमा कंपनी कर्मचारी घेऊन जात असून मी फक्त सोबत आहे असे सांगितले व त्यांनीही शिक्का पोच पावती वर शेतकऱ्यांना दिला नाही त्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांशी प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दगलबाजी करतात की काय अशी भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे....   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या