💥परभणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार आशा गरूड यांनी स्विकारला...!


💥परभणी जिल्ह्याच्या भूमिपूत्र असलेल्या आशा गरुड यांचे शालेय शिक्षण गांधी विद्यालय व बालविद्या मंदिर येथे झाले💥

परभणी (दि.२२ सप्टेंबर) : परभणी जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त होते या या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक पदी शालेय शिक्षण विभागाने आशा गरुड यांची नियुक्ती केली असून त्यांनी काल मंगळवार दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.

    परभणी जिल्ह्याच्या भूमिपूत्र असलेल्या आशा गरुड यांचे शालेय शिक्षण शहरातील गांधी विद्यालय व बालविद्या मंदिर येथे झाले. येथूनच शासकीय अध्यापक महाविद्यालयातून पदवीका पूर्ण करुन जिल्हा परिषद परभणी येथे प्राथमिक शिक्षीका म्हणून कार्यरत असतांनाच राज्य सेवा आयोगाच्या वतीने त्यांची निवड शिक्षणाधिकारी म्हणून झाली. विशेष म्हणजे त्यांची पहिली नियुक्ती शिक्षणाधिकारी (निरंतर) परभणी येथे झाली. त्यानंतर जिल्हा परिषद परभणी येथेच तीन वर्ष शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना येथे झाली होती. त्यानंतर डॉ. वंदना वाहूळ यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक पदावर शासनाने 30 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी येथे बदली केली होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या