💥परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्ठीत शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान तात्काळ पंचणामे करून नुकसान भरपाई द्या...!


💥माजी राज्यमंत्री तथा आमदार सुरेशराव वरपूडकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली मागणी💥

परभणी (दि.०८ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यात रविवार दि.०६ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२१ या दिवस सातत्याने झालेल्या अतिवृष्ठी मुळे पुर्णा-गोदावरीसह अन्य नद्या-ओढ्यांना आलेल्या पुरामुळे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी घुसून अक्षरशः शेतकऱ्यांची उभी पिक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अश्रू ढाळण्याची वेळ आल्याने जिल्ह्यात कषी क्षेत्राची दयनीय अवस्था झाल्याने जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार सुरेशराव वरपूडकर यांनी मंत्रालयात आज बुधवार दि.०८ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना अतिवृष्टीने परभणी जिल्ह्यात झालेल्या शेत पीक नुकसानी संदर्भात अवगत करून प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचणामे करण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले असल्याचे समजते.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या