💥मुंबई उपनगरीय लोकल गर्दीत वाढ ; महिन्याभरात लोकलच्या प्रवासी संख्येत १२ लाखांची भर...!💥दोन लसमात्रा घेतलेल्यांची संख्या नऊ लाख २८ हजार इतकी💥

मुंबई : उपनगरीय लोकल गर्दीत वाढ होत असून १५ ऑगस्टपासून ते आतापर्यंत साधारण १२ लाख प्रवाशांची भर पडली आहे त्यामुळे मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४० लाखांपार गेली आहे या काळात दोन लसमात्रा घेतलेल्या नऊ लाख २८ हजार ५७४ जणांना मासिक पासही देण्यात आले आहेत करोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली ११ ऑगस्टपासून दोन लसमात्रा घेतलेल्यांना मासिक पास आणि १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली. 

मुंबई महानगरात लस मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे दोन लसमात्रा घेऊन लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुरुवातीला कमीच होती पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ११ ते ३१ ऑगस्ट या काळात दोन लसमात्रा घेतलेल्या एक लाख ३६ हजार ७६५ जणांनी, तर मध्य रेल्वेवरही हीच संख्या तीन लाख ५८ हजार ७०१ होती आता वेगाने होत असलेले लसीकरण आणि सरकारी, खासगी कार्यालयीन उपस्थितीत झालेली वाढ, तसेच अन्य निर्बंध शिथिल केल्याने लोकल प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली आहे. 

आतापर्यंत मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दोन लसमात्रा घेतलेल्या एकूण सहा लाख ७७ हजार ६४३ आणि पश्चिम रेल्वेवर दोन लाख ५० हजार ९२९ जणांना मासिक पास मिळाला आहे त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्या ४० लाख ३३ हजार १४२ झाली आहे १३ ऑगस्टला (१५ ऑगस्ट आधी) हीच संख्या २७ लाख ३५ हजार ४८५ होती त्यामुळे जवळपास १२ लाख ९७ हजार ६५७ प्रवाशांची भर पडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या