💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या.....!


💥ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसने दंड थोपटले. कॅबिनेटच्या प्रभाग निर्णयाला काँग्रेसचा विरोध💥

 ✍️ मोहन चौकेकर

▪️ओबीसी आरक्षण अध्यादेशावर अखेर राज्यपालांची सही, राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा. आगामी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात हा अध्यादेश मांडल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर होणार.

▪️डोंबिवली हादरली! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 29 जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा. दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात.

▪️IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सची मुंबई इंडियन्सशी लढत..केकेआरची आरसीबीला हरवून चांगली सुरुवात, तर मुंबई इंडियन्सचा चेन्नईविरुद्ध पराभव.

▪️राज्यात आज 3,608 नवीन कोरोनाबाधित, तर 4285 रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के. दिवसभरात 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. मृत्यूदर 2.12 टक्के.

▪️T20 World Cup 2021 चं Anthem Song प्रदर्शित! कोहली, पोलार्ड, राशीद अन् मॅक्सवेलचा नवा अवतार. Live The Game असं या गाण्याचे बोल..

▪️रशियामध्ये भीषण विमान अपघात, 6 जणांचा मृत्यू, जुन्या एंटोनोव्ह एएन-26 या प्रवासी विमानाने हवेतच दम तोडला! बुधवारी रडारवरुन गायब झालं होतं.

▪️ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसने दंड थोपटले. कॅबिनेटच्या प्रभाग निर्णयाला काँग्रेसचा विरोध. राज्य सरकारला काँग्रेस नवा प्रस्ताव पाठवणार

▪️दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 294 रुपयांची घट. शुद्ध सोन्याची किंमत 45,401 रुपये प्रति 10 ग्रॅम. चांदीचे भाव 26 रुपयांनी वाढून 59,609 रुपये प्रति किलोवर बंद.

▪️मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स 958.03 अंकांनी वाढून 59,885.36 वर बंद. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 276.30 अंकाच्या वाढीसह 17,822.95 वर बंद..

▪️Weather Forecast: पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. भारतीय हवामान खात्याचा अंदाज...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या