💥भारत करोनाबाबत समाजमाध्यमातील चुकीच्या माहितीत आघाडीवर...!


💥इंटरनेट साक्षरतेच्या अभावानेही स्थिती वाढत गेली लोकांनी चुकीची माहिती पसरवली असे एका नव्या अभ्यासात दिसून आले💥 

भारतात करोना बाबत दिशाभूल करणारी सर्वात जास्त गैरमाहिती प्रसारित करण्यात आली कारण देशात इंटरनेटची पोहोचही आता मोठ्या प्रमाणात आहे देशात समाज माध्यमातील आशयही बऱ्याच प्रमाणात वाचला व बघितला जातो इंटरनेट साक्षरतेच्या अभावानेही ही स्थिती वाढत गेली लोकांनी चुकीची माहिती पसरवली असे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे. 

‘प्रिव्हॅलन्स अँड सोशल अ‍ॅनॅलिसिस ऑफ कोविड १९ मिसइनफॉर्मेशन इन १३८ कंट्रीज’ हा अहवाल ‘सेज’ च्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे जगातील १३८ देशातील ९६५७ इतक्या माहितीच्या संचांचा यात अभ्यास करण्यात आला असून त्याची शहानिशा ९४ संस्थांनी केली त्यातून गैरमाहिती पसरवण्यात आली की नाही याचा तपास करण्यात आला सर्व देशात भारतात समाजमाध्यमावर सर्वाधिक गैरमाहिती पसरवण्यात आली हे प्रमाण १८.०७ इतके होते.

याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आता भारतात इंटरनेटची पोहोच वाढली आहे त्यामुळे लोक  समाजमाध्यमांचा जास्त वापर करीत आहेत त्याच्या जोडीला इंटरनेट साक्षरतेचा अभाव म्हणजे कुठल्या आशयावर विश्वास ठेवायचा,कुठल्या नाही याची नसलेली समज हे एक कारण ठरले आहे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की करोना बाबतच्या गैरमाहितीला कुणीही बळी पडू नये त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते समाजमाध्यमातून येणाऱ्या माहितीची तपासणी करणे गरजेचे आहे असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

माहितीचा स्रोत काय आहे ? यावर माहितीची विश्वासार्हता अवलंबून असते त्यामुळे स्रोत तपासणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या