💥अनाठाई खर्च टाळून दिव्यांगांना सायकल वाटप ; मंगरुळपिर शहरातील शिवराज मित्र मंडळाचा उपक्रम...!


💥मंडळाने यावेळी डाके कुटुंबियातील चिमुकल्या दोन मुलींना रोख रक्कम व कपडे देवून युवा पिढी समोर एक आदर्श निर्माण केला💥

फुलचंद भगत

मंगरुळपिर:-शहरातील शिवराज मिञमंडळाने गणेशोत्सवाचा अनाठाई खर्च टाळुन ता १७ शनिवारी दिव्यांगांना सायकली तसेच गरजवंताला कपडे व याचबरोबर अशोकनगर येथील डाके कुटुंबियातील चिमुकल्या दोन मुलींना रोख रक्कम व कपडे देवून युवा पिढी समोर एक आदर्श निर्माण केला आहे.


शहरातील शिवराज मित्र मंडळ आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी शिवराज मित्र मंडळाच्या वतीने येथील शिवाजी महाराज चौकात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो, परंतु यावर्षी सर्व अनाठायी खर्च टाळून शहरातील दिव्यांग,गरीब गरजवंताना मदतीचा हात देऊन एक आदर्श निर्माण केला यावेळी 

मंगरूळपीर वाशिम मतदार संघाचे लोकप्रीय आमदार लखनजी मलिक,शिवराज मित्र मंडळाच्या वतीने या वर्षीसुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना सायकली वाटप व पन्नास अपंगांना कपडे वाटप करण्यात आले त्यावेळेस वाशिम मंगरूळपीर मतदारसंघाचे आमदार लखन मलिक , तहसीलदार नर्सया कोडगुर्ले,माजी नगराध्यक्ष प्रा.विरेंद्रसिंह ठाकूर, नगरसेवक पुरूषोत्तम चितलांगे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी

देशभक्ती गितांचा बहारदार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.प्रशासनाने ठरवून दिलेल्या कोरोना नियमांच्या आधिन राहुन पार पडला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.व शिवराज गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत  गावडे शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या