💥नांदेड जिल्हा महासभेच्या कार्यकारीणी सदस्यांची निवड....!


💥किनवट माहूर भागातून सात समाज बांधवांचा समावेश💥

किनवट 

नांदेड ; महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा,नांदेड जिल्हा महासभा नुतन कार्य कार्यकारीनी सदस्य निवड प्रक्रिया दि.22 सप्टेंबर 2021 रोजी साईवंदना मंगल कार्यालय किनवट येथे पार पडली. या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य व नांदेड जिल्हा , कार्यकारीणीतिल प्रमुख या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आर्य वैश्य समाज किनवट अध्यक्ष श्री दिनकरराव चाडावार ,, यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच श्री गोविंदराव बिडवई , महासचिव श्री सुभाष कन्नावार कोषाध्यक्ष श्री प्रदिप कोकडवार , प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार, श्री नंदकुमार मडगुलवार , श्री विजय कुंचनवार , श्री सदानंद मेडेवार , श्री नरेंद्र येरावार , ( पत्रकार ) , श्री राजेश्वर गंगावार, ( बिलोली ) , या मान्यवरांच्या उपस्थितीत सदरिल निवड प्रक्रिया पार पडली. आर्य वैश्य महासभा ,नांदेड जिल्हयाची शहरी व ग्रामिण असे दोन भाग तयार करुन प्रत्येक तालुक्यातून कोमटी समाजातिल बांधवांपैकी प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य म्हणून , किनवट तालुक्यातिल शहरी भागातून डॉ.श्री अशोक चिन्नावार , व श्री आशिष कंचर्लावार यांची सदस्यपदी निवड सर्वानुमते करण्यात आली. तसेच ग्रामिण भागातून बोधडी - इस्लापूर - शिवणी या सर्कल मधून श्री गजानन रंगावार , व तरुण नेत्रत्व श्री गजानन बच्चेवार  , मांडवी -उमरी बा. - वाई या सर्कल मधून श्री सतिष कोरतलवार यांची सदस्यपदी निवड झाली. माहूर तालुक्यातून श्री प्रदिप पिंपरवार, श्री दिलीप मुनगिलवार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. महासभेच्या कार्यकारिणित निवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री अमोल उत्तरवार , यांनी केले.


                 सर्व निवडप्रक्रियेसाठी जो कार्यक्रम आयोजनास वासवी क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेवून , निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात हातभार लावला. त्यात श्री अजय चाडावर , नगर परिषद सदस्य तथा पाणी पुरवठा सभापती किनवट ,श्री निशांत चाडावार, श्री महेश सामशेट्टीवार, श्री सुनिल कन्नावार , श्री विठ्ठल चिद्दरवार , श्री शिवदिप बिजमवार, श्री नितीन कोट्टावार, श्री अमोल ढाणकीकर, श्री प्रविण बनवसकर आदीनी परिश्रम घेतले. श्री राम बुसमवार , यांनी मान्यवरांचे आभार मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या