💥साप्ताहिक 'विदर्भ का कासीद' चा स्तुत्य उपक्रम मुस्लीम विद्यार्थीनींच्या सत्कार सोहळ्याचे उत्स्‍फुर्त आयोजन....!


💥मुस्लीम समाजामील शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा संपन्न💥

 ✍️ मोहन चौकेकर

चिखली : पत्रकारीतेसह सामाजीक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेले इफ्तेखार खान मन्सुर खान यांनी सामाजीक जाणीवेतुन वृत्तपत्र क्षेत्रात 15 वर्षापुर्वी पदार्पण करुन गत 3 वर्षांपासुन उर्दु मारठी साप्ताहिक विदर्भ का कासीद ची महुर्तमेढ रोवली. या साप्ताहिकाच्या माध्यमातुन चौथ्या वर्षात पदार्पण करतांना एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने प्रारंभ करावा या प्रांजळ हेतुने मुस्लीम समाजामील शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या सत्कार सोहळ्याचे शनिवार दि.4 सप्टेबर 2021 रोजी चिंच परिसरातील संत सावता माळी भवन सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्याला अध्यक्षस्थानी समरीन काज़ी, तर प्रमुख अतिथीमध्ये बिना कौसर इफ्तेखार खान, निलोफर सिद्दीकी यांची उपस्थिती लाभली.या वेळी MBBS  द्वितीय वर्ष च्या (जे.जे.हॉस्नीटल मुंबई) मदीहा अहमद याचे मौलीक मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थींनींसह उपस्थित मुस्लीम महिलांनी मिळाले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थीनींना प्रशस्तीपत्रासह प्रात्साहनपर बक्षीस देण्यात आले. या गुणगौरव सोहळ्याचे विशेष म्हणजे दर वर्षी विविध शैक्षणीक, सामाजीक व राजकीय संस्थांच्या माध्यमातुन यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन होत असते. अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लीम समाजातील युवती व महिलांना उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरत असलेल्या साप्ता. विदर्भ का कासीद आणि इख्लास इस्लामीक इन्सटीट्युट च्या संयुक्त विद्यमाने प्रथमच मुस्लीम सामाजातील बहुसंख्य विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा मुस्लीम महिलांच्या अलोट उपस्थितीत संपन्न झाल्याने चिखली शहरासह पंचक्रोशीत या उपक्रमाचे कौतुकाभिनंदन होत आहे हेही तेवढेच महत्वाचे!

साप्ता.विदर्भ का कासीदच्या माध्यमातुन वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्याचा माणस असुन यामध्ये सर्वप्रथम महिला सक्षमीकरणाच्या अणुषंगाने इयत्ता 10 वी व 12 वितील ज्य विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत अशांचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने तसेच शैक्षणीकदृष्ट्या मार्गदर्शन मिळण्यासाठी MBBS  द्वितीय वर्ष च्या (जे.जे.हॉस्नीटल मुंबई) मदीहा अहमद यांना आमंत्रीत करण्यात आले होते. उपस्थित विद्यार्थीनींसह महिला वर्गास त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाल्याने उपस्थितांमध्ये साप्ता.विदर्भ परिवाराच्या आयोजनाबद्दल कृतार्थभाव दिसुन आला. या गुणगौरव सोहळ्याचे प्रास्तावीक बिना कौसर इफ्तेखार खान (साप्ता.विदर्भ का कासीद च्या उर्दु भाषीक महिला संपादक) यांनी तर बहारदार सुत्रसंचलन रुबिना शाह आणि फातेमा शेख तर आभार प्रदर्शन निगार शेख यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शगुफ्ता खान, मुस्कान पठाण, यास्मीन जमदार, तहेसीन खान, शाहीन नौरंगाबादी, हाशमी महोम्मद, समीना शेख, तंज़ीला इफ्तेखार खान, फरहान खान, हसनैन रज़ा खान, आशीक जमादार, खलील नय्यर, यांनी परीश्रम घेतले....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या