💥पुर्णेतील पत्रकारांचा पोलिस प्रशासनाकडून गणेश महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समीतीच्या बैठकीवर बहीष्कार...!


💥पोलिस प्रशासनाकडून पत्रकारांची सातत्याने मुस्कटदाबी ; घडलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ💥

पुर्णा (दि.०८ सप्टेंबर) - पोलिस प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि.०८ सप्टेंबर २०२१ रोजी शहरातील जुना मोंढा परिसरातील गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहात आयोजित शांतता समीतीच्या बैठकीवर पुर्णेतील अखील भारतीय मराठी पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी बहिष्कार घालुन कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने पोलिस प्रशासन विरुध्द पत्रकार अश्या असहकार संघर्षाला सुरूवात झाल्याचे आज निदर्शनास आले. 

  सर्वसामान्य नागरिक व प्रशासनातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे पत्रकार असतो समाजात काम करत असताना.समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना टिपतो. अन्यायाला,भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचेही काम सातत्याने पत्रकारच करीत असतो सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करण्याचे काम पत्रकार करतो म्हणूनच त्याला शांतता समीमीचा कृतीशील सदस्य म्हणून ओळखले जाते

 असे असतानाही पुर्णेत मात्र पोलिस प्रशासनाकडून पत्रकारांची सातत्याने मुस्कटदाबी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पुर्णा पोलीस प्रशासन व मराठी पत्रकार संघटनेच्या वर्तमान पदाधिकाऱ्यांमध्ये ढुसफुस वाढली आहे.पुर्णा पोलिस स्थानकात नव्याने रुजु झालेले पोलिस अधीकारी हे पत्रकारांना घडलेल्या घटना दुर्घनांसह विविध गुन्ह्यांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्यानेही पत्रकारांतून नाराजीचा सुर निघतांना दिसत असून पत्रकार घडलेल्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस स्थानकात गेल्यावर अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना सन्माजनक वागणूक देत नसल्याचे पत्रकारांतून बोलले जात आहे.

पुर्णेत पोलिस प्रशासनाकडून आज बुधवारी राजाराम बापू सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.या बैढकीस पोलीस, महसुल महावितरण,पालीका प्रशासनातील अधिकाऱ्यांसह, लोकप्रतिनिधी, काही निवडक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.मात्र शहरातील अ.भा.पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी एकजुट दाखवत पोलीस प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध व्यक्त करत बहीष्कार घालून बैढकीकडे पाठ फिरवल्याने पोलिस प्रशासन व पत्रकारांतील संघर्ष आज उजागर झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या