💥परभणी येथील श्री छत्रपती शाहु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन...!


💥संस्थेचे सचिव किशनराव काळे व सदस्य प्रकाशराव मस्के यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण💥


परभणी - (दि.१७ सप्टेंबर) येथील कृषी नगर येथील श्री छत्रपती शाहु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज शुक्रवार दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संस्थेचे सचिव किशनराव काळे व सदस्य प्रकाशराव मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी प्रमुख पाहुणे जी.आर.देशमुख,आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक लोंढे सर,पालक प्रतिनिधी बल्लाळ साहेब, पत्रकार सोमेश्वर लाहोरकर ,मुख्याध्यापक माणिक गोंगे सर,शिक्षक कर्मचारी आदी.उपस्थित ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.


तसेच यावेळी सुत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केली व मुख्याध्यापक गोंगे सर यांनी मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. व  काळे सर यांनी आभार मानत कार्यक्रम चा समारोप केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या