💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक मा.विस्तार अधिकारी शिवदासआप्पा महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन..!


💥गट साधन केंद्रातील लिपीक अरूणअप्पा महाजन यांचे ते वडील होते💥

पुर्णा (दि.०८ सप्टेंबर) - तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक तथा माजी विस्तार अधिकारी शिवदासआप्पा ओंकारआप्पा महाजन यांचे आज बुधवार दि.०८ सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांचा स्वभाव अगदी बोलका होता.त्यांनी शिक्षकापासून ते विस्ताराधिकारी या पदावर सेवा केली.त्यांनी आपल्या कारकिर्दीत भरपूर विद्यार्थी घडवले.त्यांच्या पश्चात तीन मुल,दोन मुली,नातू,पंतु, असा त्यांचा मोठा परिवार आहे गट साधन केंद्र पुर्णा कार्यालयातील लिपीक श्री अरूनआप्पा महाजन यांचे ते वडील होत.
त्यांचा अंत्यविधी त्यांच्या गौर गावातील त्यांच्या मळ्यात आज बुधवार दि.०८ सप्टेंबर रोजी सायं.०४-०० वाजता करण्यात येणार आहे.. या दुःखद प्रसंगातून सर्व कुटुंबीयांना सावरण्याचं ईश्वर बळ देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या