💥गोपालआप्पा काय केलं तुम्ही हे... आमचा नाही तर परिवाराचा तरी विचार करायला पाहीजे होता ?


💥मिञ परिवारासह आप्तगण बुडाले शोकसागरात पोलीसांच्या ताब्यातील 'त्या' सहा पानाच्या चिठ्ठीत केलं मनमोकळं💥

फुलचंद भगत

वाशिम - येथील शिवा संघटनेचे धडाडीचे, निडर आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्व आणि सामाजीक कार्यकर्ते गोपालआप्पा महाजन यांनी २२ सप्टेंबरच्या रात्री फाशी घेवून आत्महत्या केल्याची घटना कळली आणि शिवा संघटनेसह सर्व समाजबांधव, मित्र परिवार आणि वाशिमकर शोकसागरात बुडाले आहेत. एवढा कणखर व धाडसी माणूस, लढाऊ बाणा असलेल्या गोपालआप्पाने जीवनाच्या लढाईत पराभव पत्करुन एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच त्यांना जाणणार्‍या व मानणार्‍या प्रत्येकाचे डोके बधीर झाले आहे. 

नेहमी हसतखेळत राहणारा व प्रत्येकाशी भरभरुन बोलणारा, दुसर्‍याचे दु:ख समजून घेणारा, कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून जाणारा व कोरोनाच्या विळख्यात सापडून मृत्युच्या दाढेतून परत येणारा उमद्या मनाचा माणूस आज आमच्यात नाही हा विचार करुनच मन गलबलुन जात आहे. डोळ्याला आपसुकच धारा लागल्या आहेत. शिवा संघटनेतील एक महत्वाच्या पदाची जबाबदारी घेवून हिंगोली नाका येथे महात्मा बसवेश्वर चौकाच्या सौदर्यीकरणासाठी संघर्षाचा पवित्रा घेणार्‍या गोपालआप्पाच्या प्रयत्नाने व पुढाकाराने सौदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. यासाठी त्यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशाराही दिला होता. शिवाय त्यांच्याच प्रयत्नाने या सौदर्यीकरण कामासाठी खासदार भावनाताईंनी ३ लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला होता...

  हजारो मित्रपरिवार, नातेवाईक, पत्नी, मुले व वाशीमकरांना वार्‍यावर सोडून अखेर गोपालआप्पा महाजन यांनी अखेरचा निरोप घेतला. जातांना त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर बाय बाय लिहून ठेवले होते. अत्यंत कमी वयात त्यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याने अनेकांना जबर धक्का बसला आहे. मेंदु आणि मन सुन्न झाले आहे. आत्महत्या करण्याआधी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांची आपले मन मोकळं केल्याची माहिती असून पोलीसांच्या ताब्यात असलेली ही चिठ्ठी त्यांच्या आत्महत्येेमागील गुढ उकलु शकते.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या