💥परभणी जिल्ह्यातील पाथरा येथे एच.एम.क्लाॅज इंडिया प्रा.लि.हैद्राबाद तर्फे शेतकरी मेळावा संपन्न...!


💥वातावरणातील होणाऱ्या बदलानुसार शेतकरी बांधवांनी शेती करणे ही काळाची गरज - नंदकिशोर कारले शेतकरी मार्गदर्शक

परभणी ; जिल्ह्यातील पाथरा येथे रविवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी एच.एम.क्लाॅज इंडिया प्रा.लि.हैद्राबाद यांच्या विद्यमाने टरबूज हायब्रिड नंबर-०६ ,पिकाची कार्यशाळा व शेतकरी बांधवा बरोबर चर्चा सत्र व शेतकरी मेळावा संपन्न झाला .


 यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीच्या वतीने ऋषिकेश पाटील(रिजनल बिझनेस मॅनेजमेंट) , संजय आंबरे(प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर) ,वीरेंद्र जयस्वाल (एरिया सेल्स मॅनेजर) ,संजय देशमुख (विदर्भ) ,सुरेश कांबळे(मराठवाडा प्रतिनिधी) सह आदींची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांन समवेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन करत शेतीचे आधुनिकीकरण कसे करायला पाहिजे व त्याचबरोबर वातावरणातील सतत होत असलेले बदल आपल्या शेतीसाठी कशा पध्दतीने अनुकूल करायचे यावर येथील शेतात जाऊन सविस्तर चर्चा करत मार्गदर्शन केले . 


हा कार्यक्रम पाथरा येथील प्रगतिशील शेतकरी सय्यद समद सय्यद मोहम्मद  यांच्या शेतात पार पडला यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती विनोद भैया लोहगावकर , शेख असलम परभणीकर ,गजानन काकडे जिंतूर , सोनू सिंग ठाकूर गंगाखेड ,नितीन हरिभाऊ निकम ,नागनाथ कदम , विजय शिंदे सहजपूर ,यावेळी या कार्यक्रमास  जिल्ह्याभरातुन मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते .

त्याचबरोबर यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे प्राध्यापक शिंदे ,अनिल कांदळकर आदींची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एच.एम.क्लाॅज चे सेल्स डेव्हलपमेंट ऑफिसर सुदर्शन सोनकांबळे ,सय्यद जुनेद ,सय्यद मोहम्मद ,नंदकिशोर कारले सह आदींनी प्रयत्न केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे तर आभार प्रदर्शन सय्यद मोहम्मद यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या