💥देशाला कोरोनातुन मुक्त करण्याची प्रार्थना करत शिवराज मिञमंडळाने दिला बाप्पाला निरोप....!


💥विसर्जनसमयी तोफेनी केली पुष्पवृष्टी💥

फुलचंद भगत -

मंगरुळपीर :शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज दि19/9 रोजी रविवारी शिवराज गणेश मंडळाचे वतीने गणेश विसर्जन सोहळा साजरा करण्यात आला यावेळेस श्री चे पूजन करुन बाप्पाला नीलोप दिला.यावेळी  नगरसेवक अनिल गावंडे  , प्रतिकात्मक रूप धारण केलेले बाल श्री गणेश म्हणून भावेश ईश्वर जोशी व प्रतिकात्मक छत्रपती  शिवाजी महाराज बाल स्वराज किशोर गावंडे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . तर बाल गणेश भावेश ईश्वर जोशी ने विसर्जन रथ चालवत अनोखे आकर्षण ठरले होते .नगरसेवक अनिल  गावंडे हे दरवर्षी अनोखा असा उपक्रम राबवत असतात यावर्षी  गणपती बाप्पा च्या मूर्तीवर तोफे ने पुष्पवृष्टी केली. शहरात लहान व मोठ्यामध्ये कुतूहलाने तोफे द्धारे पुष्पवृष्टी केल्याची चर्चा सुरू होती .


तर या देशाला कोरोना महामारी चे संकटातून मुक्त कर अशी प्रार्थना बाप्पा च्या चरणी करून पूढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला याप्रसंगी शिवराज मित्र अध्यक्ष प्रशांत गावंडे व कार्यकर्ते रवी  चव्हाण , विनोद कोळकर , परशराम जोशी , ईश्वर जोशी , राजाभाऊ इंगळे , गणेश राऊत , निलेश राऊत, पिंटू भुजाडे , भानुप्रताप ठाकूर , किशोर गावंडे शुभम नेताम , रविबुधे, बळीराम ठाकरे ,तसेच शिवराज मित्र मंडाळचे कार्यकर्ते व चौका मधील नागरिक  उपस्थित  होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या