💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या...!


💥“आता दया,माया,क्षमा दाखवता येणार नाही”; फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा💥

✍️ मोहन चौकेकर  

1) 🌧️ *हवामान खात्याचा रत्नागिरी आणि रायगडला रेड 🟣 अलर्ट हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे धुळे,नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी  

2) पिक विम्याचा बीड पॅटर्न महाराष्ट्राने विकसित केला ; केंद्र सरकारने परवानगी मात्र  मध्यप्रदेशला दिली व महाराष्ट्राला नाकारली, कृषी मंत्री दादा भुसे यांचा आरोप 

3) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार ; तर राज्यातील महाविद्यालये १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्यात येणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

4) 🛕 राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधान

5) “आता दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही”; फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

6) गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारचा पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय : दोन-तीन दिवसांत  नियमावली जाहीर होण्याची शक्यता  

7) तामिळनाडूमध्ये १ सप्टेंबरपासून १० आणि १२वीच्या शाळा उघडण्यात आल्या ; शाळा उघडताच ३० विद्यार्थी आणि शिक्षक करोना पॉझिटीव्ह 

8) चिंता वाढली नागपूरच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील ११ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवलं 

9) निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील;* विजय वडेट्टीवारांचं नागपुरात विधान

10) विनायक मेटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मराठा समाजाबाबत बैठक ; मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा  विनायक मेटे यांची माहिती

11) "आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का?”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

12) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला अप्रत्यक्षरित्या सुनावलं.

13) पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…*

14) रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार असल्याची देखील माहिती दिली आहे.

15) रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा, चिपळूणमध्ये पुन्हा एकदा महापुराची भीती; NDRF टीम दाखल*

16) चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन सज्ज

17) मुंबई कोर्टाकडून सलमान खानला दिलासा, प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी : सलमान खानने या गेम विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

18) ⚖️ *नरेंद्र दाभोलकर हत्या : सनातन संस्थेच्या पाच सदस्यांवर आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश : या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे...

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या