💥आपत्ती व बचाव पथकाला प्राचारण करुन शोधमोहीम राबवली परंतु तीन दिवस ऊलटुनही शोध लागला नाही💥
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील मसोला येथील व्यक्ती गुरे चारण्यासाठी गेला असता नदिमध्ये वाहुन गेल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाने आपत्ती व बचाव पथकाला प्राचारण करुन शोधमोहीम राबवली परंतु तीन दिवस ऊलटुनही शोध लागला नाही.
मंगरूळपीर पो.स्टे.चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या आदेशाने व मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला शाखा मंगरूळपीर चे स्वयंसेवक अतुल उमाळे,गोपाल गीरे, सुमित मुंढरे,अपुर्व चेके, सोनु,सुडके मंगेश मांढरे, यांनी सर्च ऑपरेशन राबविले परंतु काही मिळुन आले नाही बरेच ठीकाणी बंधारे आणी आत लोखंडी बार असलेल्या ठीकाणी शोध कार्यात अडचण येत आहेत आज परत नदीला पुर वाढल्याने मृतदेह समोर जाण्याची शक्यता आहे यामुळे शुक्रवारी याच पद्धतीने सर्च ऑपरेशन राबविण्यात येईल जर यश आले नाही तर शनिवारी परत आंम्ही रेस्क्युवर बोट द्वारे व अंडरवाॅटर सर्च ऑपरेशन चार टीम सह युद्ध पातळीवर सर्च ऑपरेशन राबविण्यात येणार अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या