💥झारखंड राज्यातील टाटानगर येथील 'सैराट प्रेमी युगल' नंदीग्राम एक्सप्रेस मधून रेल्वे सेनेने घेतले ताब्यात....!💥रेल्वे सेनेला शोधमोहीमे नंतर 'सैराट प्रेमी युगल' नंदीग्राम एक्सप्रेसच्या एस-४ मधील शौचालया जवळ आढळले💥

औरंगाबाद ; झारंखड राज्यातील टाटानगर येथील 'सैराट प्रेमी युगल' सैराट सिनेस्टाईल घरच्यांच्या डोळ्यात धुळ झोकून पलायन करून गाडी संख्या क्रमांक ०१४०२ अदीलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये प्रवास करीत असल्याची पक्की खबर रेल्वे सेना ग्रुपच्या सदस्याने रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली. 

मिळालेल्या माहिती वरून रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी व सहकाऱ्यांनी २४ कोच (डब्बे) असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसने औरंगाबाद रेल्वे स्टेशन सोडल्यावर या सैराट प्रेमी युगलाचा तपास धावत्या रेल्वेत सुरू केला यावेळी नंदीग्राम एक्सप्रेस औरंगाबाद पोटूळ स्टेशनवर असताना हे 'सैराट युगल' नंदीग्राम एक्सप्रेसच्या कोच एस-४ मधील शौचालया जवळ पुढील आयुष्याचे स्वप्न रंगवतांना रेल्वे सेना अध्यक्ष सोमानी व त्यांच्या सहकाऱ्यांना आढळून आले....,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या