💥खेड येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सहा जनांचा बलात्कार ; चार आरोपीत नराधमांना पोलिसांनी केली अटक....!


💥शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी साधला संवाद💥 

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी साधला संवाद खेड परिसरात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी विनयभंग करत बलात्कार केला असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे या प्रकरणी चार आरोपींना बेड्या ठोकण्यात खेड पोलिसांना यश आले आहे अगोदर गावातील एका तरुणाने पीडित मुलीचा विनयभंग केला होता तेच पाहून इतरांनी त्याचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या दिवशी आणि ठिकाणी पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला हे सर्व प्रकरण तीन ते चार महिने सुरू होते अस पोलिसांनी सांगितले आहे सोन्या घुमटकर,आकाश सुनिल शिंदे, परेश माणिक ढमाले, अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक, सुरज सुनिल रोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या नराधम तरुणांची नावे आहेत. 

या घटने प्रकरणी पीडित मुलीच्या आई ने खेड पोलिसात तक्रार दिलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ मे २०२१ ते दि.१५ ऑगस्ट २०२१ या दरम्यान अगोदर आरोपी घुमटकर याने पीडित अल्पवयीन मुलीचा धमकावत विनयभंग केला होता तस तक्रारीत म्हटलं आहे त्यानंतर इतर पाच आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि दिवशी प्रत्येकाने पीडित मुलीला धमकावून बलात्कार केला आहे. 

या प्रकरणाची माहिती आणि वाच्यता अवघ्या गावात झाल्या नंतर पीडित मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना समजली त्यांनी तात्काळ मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असत अत्याचार झाल्याचं तिने सांगितले दरम्यान, आरोपींनी पीडित मुलीला धमकावून आम्ही बोलावलं की यावं लागेल अस म्हटलं होतं त्यामुळं पीडित अल्पवयीन मुलगी भीतीच्या सावटाखाली होती पोलिसांकडून पीडितेचे समुपदेशन करण्यात आलं आहे घटनेप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अद्याप दोन जण फरार अाहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या