💥पुर्णेतील शैक्षणिक क्षेत्राकडून वैद्यकीय महाविद्यालयासाठी यशस्वी लढा देणाऱ्या खा.संजय (बंडु) जाधव यांचा सत्कार..!


💥शहरातील नामांकीत श्री गुरूबुध्दी स्वामी महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रमोद उर्फ राजुआण्णा एकलारे यांनी केला सत्कार💥

परभणीत शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी यशस्वीपणे सर्वपक्षीय आंदोलन उभे करुन जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीचा लढा यशस्वी केले यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाड्याची राजधानी संभाजी नगर (औ.बाद) येथे परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली सदरील लढा यशस्वी करणाऱ्या व परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय     मंजुर करुन घेतल्या बद्दल पुर्णा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या वतीने खा.संजय (बंडु) जाधव यांचा शहरातील नामांकीत शिक्षण संस्था श्री गुरूबुध्दी स्वामी महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रमोद उर्फ राजुआण्णा एकलारे यांनी सत्कार आला.

     मागील अनेक वर्षांपासून परभणीत शासकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी परभणीकर आग्रही होते.अनेक निवेदन, धरणे, शासकीय स्तरांवर प्रयत्न सुरू होते. खा.जाधव यांनी पुढाकार घेऊन परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून वैद्यकीय महाविद्यालय पदरात पाडून घेण्यासाठी मोठा लढा सुरू केला होता.स्वाक्षरी अभियान महीला, विद्यार्थी,वारकरी सांप्रदाय,वकिल संघ,शिक्षक कर्मचारी यांचे सह  धरणे आंदोलन केले.या सर्व आंदोलनाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी यश मिळाले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी परभणीला २०० खाटांचे महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली खऱ्या अर्थाने खा.जाधव यांच्या प्रयत्नांचे चिज झाले.त्यांच्या या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचा पुर्णेचे श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रमोद (राजु) एकलारे यांच्या वतीने दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांच्या परभणी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक श्याम कदम,मा.नगरसेवक गजानन हिवरे, जेष्ठ शिवसैनिक शिवराज पाथरकर, उपशहरप्रमुख शंकरभैय्या गलांडे , युवराज सुर्यवंशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या