💥कोरोना मृताच्या नातेवाईकांना सरकारी कचेऱ्यांमध्ये किंवा इतर कारणासाठी मृत्यू प्रमाणपत्र देताना येताय अनेक अडचणी...!


💥मे. सुप्रीम कोर्टानं सुनावल्यानंतर केंद्राचं महत्त्वपूर्ण पाऊल ; सुधारित नियमावली जारी💥

देशात गेल्या दोन वर्षांपासून करोना ठाण मांडून बसला आहे. हजारो कुटुंबांन आपल्या आप्तस्वकीयांना या संकटामध्ये गमवावं लागलं आहे मात्र त्यानंतर मिळणाऱ्या मृत्यूच्या दाखल्यावर अर्थात Death Certificate वर करोनामुळे मृत्यूच्या उल्लेखाबाबत संभ्रम होता त्यामुळे संबंधित मृताच्या नातेवाईकांना सरकारी कचेऱ्यांमध्ये किंवा इतर कारणासाठी हे प्रमाणपत्र देताना अडचणी निर्माण होत असत यासंदर्भात देशाच्या मे.सर्वोच्च न्यायालयाने ३० जून रोजी केंद्र सरकारला याबाबतची नियमावली अधिक सुटसुटीत आणि सोपी करण्याचे निर्देश दिले होते.

 मात्र त्यानंतर देखील केंद्राकडून त्याबाबत पावलं उचलण्यात न आल्याने अखेर ३ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मे.कोर्टानं सरकारला त्यासंदर्भात जाब विचारला त्यानंतर अखेर आता केंद्र सरकारने यासंदर्भातल्या नियमावलीमध्ये अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी सुधारीत नियमावली जारी केली आहे करोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करणारी याचिका मे.सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

 या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मे.न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतर आता केंद्र सरकार आणि आय.सी.एम.आर.(I.C.M.R.) यांनी संयुक्तपणे करोनासंदर्भातल्या मृत्यूंना देण्यासाठीच्या प्रमाणपत्राविषयी सुधारित नियमावली जारी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या