💥अन् दिवाळी आधीच शेतकऱ्यांचे दिवाळं...सोयाबिनच्या भावात कमालीची घसरण ; शेतकर्‍यांची झाली घोर निराशा...!


 💥घसरलेल्या भावामुळे ऊत्पादक खर्चही निघत नसल्याने बळीराजा झाला चिंताग्रस्त💥

फुलचंद भगत

वाशिम:-दहा हजार रूपये प्रतिक्विंटल भाव असलेल्या सोयाबिनच्या सध्याच्या भावामध्ये कमालीची घसरण झाल्याने शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे.या अचानक गडगडलेल्या भावामुळे दिवाळीपुर्वीच शेतकर्‍यांचं दिवाळं निघालं असुन अशातच पावसानेही अचानक डोके वर काढल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची शेतकर्‍यांना चिंताही सतावत आहे. घसरलेल्या भावामुळे ऊत्पादक खर्चही निघत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

              सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच सोयाबीनचे भाव प्रती क्विंटल दहा हजारजवळ असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त केल्या जात होते. पण सोयाबीन आवक बाजारपेठेत सुरु होताच, पंधरा दिवसाच्या आतच सोयाबीनच्या भावात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. सध्या असलेल्या सोयाबीन च्या किमतीमध्ये सोयाबीन पेरणीला घेतलेले महागडे बी-बियाणे,खते, आणि कीटकनाशके याचा पदरमोड करून केलेला खर्चही निघेल याची शास्वती नाही. एकीकडे सोयाबीन तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत आणि अशातच  सोयाबीनच्या किमतीत निम्याहून अधिक घट झाल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केल्या जात आहे. त्यातच परतीच्या पावसाने ऐन सोयाबीन काढणीच्या काळातच जोर धरल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास ही निघून जातो की काय ? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.शेतकऱ्यांनी पिकावलेल्या सोयाबीन मालावर व्यापारी अन खाद्यतेल कंपन्या प्रचंड नफा मिळवत असतानाच जगाला घाम गाळून जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अजून किती काळ उपाशी पोटी राहाव लागेल ?हा प्रश्न सर्व सामान्यकडून विचाला जातो.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या