💥संतापजनक ; बिहारमधील कटिहार जिल्ह्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने घेतला विद्यार्थिनीच्या गालाचा चावा....!


💥यानंतर संतप्त गावकऱ्यांकडून मुख्याध्यापकाला करण्यात आली बेदम मारहाण💥 

बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यात शाळेच्या मुख्याध्यापकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई केली आहे बिहारमधील कटिहार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

घटनास्थळी उपस्थित साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गातील १२ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत गालाचा चावा घेतला मुलीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर लोकांनी रुममध्ये धाव घेतली यानंतर आरोपी मुख्याध्यापकाला शाळेतील एका रुममध्ये बंद करुन ठेवण्यात आलं होतं यादरम्यान मुलीचे नातेवाईक आणि इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळाली त्यांनी शाळेच्या बाहेर गर्दी केली होती थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलीस मुख्याध्यापकाला घेऊन जात असताना संतप्त ग्रामस्थांनी आरोपीवर हल्ला केला. 

पोलिसांसमोर मुख्याध्यापकाला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली यानंतर पोलिसांनी आरोपीची जमावाकडून सुटका करुन घेत पोलीस स्टेशला नेल मारहाणीचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आरोपीने आपल्याला मानसिक त्रास होता आणि त्यातच चुकून हे कृत्य झाल्याचा दावा केला आहे दरम्यान गावकऱ्यांनी याआधीही अशा घटना घ़डल्या होत्या आणि त्यामुळेच प्रकरण हातात घेतल्याचं सांगितलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे तसंच कायदा हातात घेणाऱ्या गावकऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या