💥मंगरुळपीर तालुक्यातील मसोला येथील व्यक्ती नदीत गेला वाहुन....!


💥माहीती मीळताच पोलीस घटनास्थळी पोहचले ; आपत्ती व्यवस्थापन आणी बचाव पथकाला तात्काळ प्राचारण करण्यात आले💥

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील मसोला येथिल एक व्यक्ती गुरे चरण्यासाठी गेले असता खरबी पिंप्री येथुन अडाण नदी मध्ये अंदाजे 12: 30 च्या सुमारास वाहून गेले आहे अशी माहीती मिळाली आहे.घटनेची माहीती मीळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणी आपत्ती व्यवस्थापन आणी बचाव पथकाला तात्काळ प्राचारण करण्यात आले. घटनास्थळी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ति व्यवस्थापन बचाव पथक दाखल झाले. पण रात्र होत असल्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळीच पुन्हा एकदाच शोध मोहिम सुरु करू अशी माहीती बचाव पथकाकडुन मीळाली आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या