💥राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट- यू.जी.) परीक्षा लांबणीवर टाकण्यास मे.सर्वोच्च न्यायालयाचा नकार....!


💥परीक्षेचे वेळापत्रक  बदलणे ‘अत्यिंत अनुचित’ ठरेल, असे मत मे.न्यायालयाने व्यक्त केले💥

नवी दिल्ली : १२ सप्टेंबरला होऊ घातलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट- यू.जी.) परीक्षा पुढे ढकलण्यास मे.सर्वोच्च न्यायालयाने  नकार दिला आपण या प्रक्रियेत हस्तक्षेप करू इच्छित नाही आणि परीक्षेचे वेळापत्रक  बदलणे ‘अत्यिंत अनुचित’ ठरेल, असे मत मे.न्यायालयाने व्यक्त केले. 

विद्यार्थ्यांना अनेक परीक्षांना बसायचे असेल तर त्यांना प्राधान्य निश्चित करावे लागेल आणि त्यातून निवड करावी लागेल कारण परीक्षांच्या तारखांबद्दल प्रत्येकजण समाधानी राहील अशी परिस्थिीत कधीच असणार नाही असे न्या.अजय खानविलकर,हृषीकेश रॉय व सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले तथापी,या मुद्दयावर सक्षम अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा असेल आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत कायद्यानुसार लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मे.न्यायालय म्हणाले. 


इतर अनेक परीक्षा १२ सप्टेंबरच्या आसपासच होणार असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेली नीट- यू.जी. २०२१ ही परीक्षा पुढे ढकलली जावी असा युक्तिवाद आलम यांनी केला होता सर्वाना वेठीस धरता येणार नाही परीक्षा पुढे का ढकलावी ? याबाबत तुम्ही जी कारणे सांगत आहात ती कदाचित ९९ टक्के उमेदवारांच्या बाबतीत सुसंगत नसतील एक टक्का उमेदवारांसाठी संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली जाऊ शकत नाही असेही मे.खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकील शोएब आलम यांना सांगितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या