💥दक्षिण अफ्रीकेत मधमाशांनी घेतला ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनचा जीव ; प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर....!


💥अशी माहिती फाऊंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी दिली💥

मधमाशांच्या झुंडीने केप टाऊनच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनला मारून टाकल्याचं समोर आलंय मारले गेलेल्या पेंग्विनची प्रजाती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत्यामुळे अशा प्रकारची घटना घडणं दुर्दैवी आहे असं दक्षिण आफ्रिकेचे फाउंडेशन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ कोस्टल बर्ड्सने सांगितलं “चाचणी केल्यानंतर, पेंग्विनच्या डोळ्यांभोवती मधमाशांचे दंश आढळले. 

अशाप्रकारे मधमाशानी तब्बल ६३ पेंग्विनला मारणं ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे अशी माहिती फाऊंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी दिली डेव्हिड रॉबर्ट्स यांन ए.एफ.पी.ला दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी मृत पेंग्विन आढळले त्या ठिकाणी मृत मधमाशाही सापडल्या मृत आढळलेले सर्व पेंग्विन हे केप टाऊनजवळील सिमोनटाउनमधील या शहरातील आहेत हा परिसर राष्ट्रीय उद्यान असून आणि केप मधमाशा या पर्यावरणीय व्यवस्थेचा भाग आहेत पेंग्विन आधीच नष्ट होण्याचा धोका आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने मरायला नको ते संरक्षित प्रजाती आहेत असं रॉबर्ट्स म्हणाले दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय उद्यानांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की सर्व मृत पेंग्विनला पोस्टमार्टमसाठी फाउंडेशनमध्ये नेण्यात आले. 

तसेच रोग आणि विष चाचणीसाठी त्यांचे नमुने पाठवण्यात आले आहे कोणत्याही पक्ष्याला कोणतीही बाह्य शारीरिक दुखापत आढळली नाही परंतु सर्वांवर मधमाशांनी दंश केल्याचं पोस्टमॉर्टममध्ये दिसून आलंय आफ्रिकन पेंग्विन हे दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आणि बेटांवर राहतात.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या