💥वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव येथील आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित...!


💥औरंगाबाद येथे १६ सप्टेंबर २०२१ रोजी सन्मानित करण्यात आले💥 

फुलचंद भगत

वाशिम : जिल्ह्यातील कोकलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शिक्षिका मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांना रयतेचा कैवारी शैक्षणिक डिजिटल दैनिक वृत्तपत्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त "राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने" १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले. 

               नागराळे यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले असून दप्तर मुक्त शाळा, गोष्टीचा शनिवार, तंबाखू मुक्ती साठी बाबास पत्र लिहा, तंबाखूजन्य पदार्थाची होळी, पक्षी वाचवा उपक्रम तसेच शैक्षणिक pdf, PPT, flipbook तयार करणे आणि राज्यभरातील शिक्षिकांना 'उपक्रमशील व तंत्रस्नेही' व्हाट्सअप समूहाद्वारे लॉकडाउन काळामध्ये ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करणे व लॉकडाऊन काळात हजारो शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून युट्युबवर प्रसारित करीत शाळा बंद पण शिक्षण आहे सुरू या सदराखाली महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर लॉकडाउन काळात माजी विद्यार्थ्यांकडून जे नोकरीवर लागले आहेत अशा विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषद शाळेचे ऋण व्यक्त करण्याकरता लोकसहभाग गोळा करून शाळेची उत्कृष्ट रंगरंगोटी केली आहे. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात नाव कमावले आहे. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यातले व जिल्ह्यातले विद्यार्थ्यांचे पहिले काव्यसंग्रह 'उमलती फुले' स्वखर्चाने प्रकाशित केले असून त्यांचे 'चिमणी पाखरं' आणि स्वराज्याचे मावळे हा ऐतिहासिक काव्यसंग्रह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, खासदार भावना गवळी, आमदार पाटणी,आमदार अमित झनक व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे  (स्वराज्यरक्षक मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता )यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.त्यांचे अनेक लेख व जवळपास ४० पुस्तकावरची समीक्षेने, कविता, महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी.बी. जाधव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास रहाणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, रेतीचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती.मिनाक्षी नागराळे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षण वर्गाकडून तसेच शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना वाशिम, मराठा सेवा संघ वाशिम, उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका-समुह, सर्व शिक्षक वृंदाकडून कौतुक होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर:-वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या