💥परळी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र जाहिर...!


💥सर्व नागरीकांनी श्रीगणेश मुर्ती नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय संकलन केंद्रात देण्याचे आवाहन -  सभापती अन्वर मिस्किन

परळी वैजनाथ : प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी अनंत चतुर्दशी निमित्त श्री वैद्यनाथ मंदिरच्या बाजुस असलेल्या हरिहर तिर्थामध्ये श्रीगणेश विसर्जन करण्यात येणार आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता गणेशोत्सव - 2021 च्या मार्गदर्शक सुचना निर्गमित झाल्या असुन या वर्षीचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे बाबत आदेशीत करण्यात आले आहे. 


श्रींच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येवु नयेत असे निर्देश प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी  मा. ना.धनंजयजी मुंडे साहेब, न.प. चे गटनेते वाल्मीक (आण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या नियोजनात न.प.अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व स. सभापती, सर्व स. सदस्य / सदस्या यांच्या सहकार्याने स्वच्छता, आरोग्य व वैद्यक सभापती  अन्वर मिस्किन यांनी परळी शहरामध्ये गणेश मंडळामार्फत स्थापन करण्यात आलेल्या श्रीगणेश मुर्ती तसेच नागरीकांनी त्यांच्या घरी स्थापन केलेल्या श्रीगणेश मुर्ती संकलीत करण्याकरीता खालील प्रमाणे प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलीत करण्यासाठी स्थळ (केंद्र) निश्चित केलेले आहेत,  

तरी परळी शहरातील सर्व नागरीकांनी आप-आपल्या प्रभागात निश्चित केलेल्या श्रीगणेश मूर्ती संकलन केंद्रावरच श्रीगणेश मुर्ती नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे द्यावी जेणे करुन श्रीगणेश मुर्तीचे विधिवत विसर्जन करणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी 1) श्री. संतोष रोडे. कार्यालय अधिक्षक न.प. परळी वै. (मो.क्र. 9822245856) 2) श्री. दिलीप वि. गुट्टे, सहाय्यक कार्यालय अधिक्षक, न.प. परळी वै. (मो क्र. 9423472622), 3) श्री. श्रावण घाटे, स्वच्छता निरीक्षक, न.प.परळी वै. (9561189655), 4) श्री. शंकर साळवे, प्र. स्वच्छता निरीक्षक, न.प. परळी वैजनाथ (मो.क्र. 9881839783) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्वच्छता, आरोग्य व वैद्यक सभापती अन्वर मिस्किन यांनी केले आहे.


-सविस्तर प्रभाग निहाय संकलन केंद्राची माहिती खालील प्रमाणे आहे -

प्रभाग क्र.1) मिलिंद नगर, थर्मल कॉलनी, खतीब बेकरी या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र थर्मल कॉलनी मुख्य गेट वर असणार आहे. संपर्क अधिकारी - नितीन घाडगे - 8149800400

प्रभाग क्र.2) बरकत नगर, शिव नगर, भिमानगर, सिद्धेश्वर नगर, सटवाई मळा या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र बरकत नगर चौक या ठिकाणी असणार आहे. संपर्क अधिकारी - कपिल जगतकर - 8788006639

प्रभाग क्र.3) उखळवेस परिसर, साठे नगर, ताटे गल्ली, रोडे गल्ली, रमा नगर,भीम नगर परिसर, अनंतपुरे गल्ली, देशपांडे गल्ली, बांगर गल्ली, गणेशपार, धनगर गल्ली, होळकर चौक या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र सावता माळी मंदिर कमान श्री दीपक नाना देशमुख यांच्या घराजवळ असणार आहे. संपर्क अधिकारी - प्रवीण शिनगारे - 7720077170

प्रभाग क्र.4) गणेशपार, काळरात्री देवी मंदिर परिसर, देशमुख गल्ली,गणेशपार, जंगम गल्ली, गोराराम मंदिर,जगतकर गल्ली, बुद्ध विहार समोरचा भाग, बंगला गल्ली, सरकारवाडा वैद्यनाथ विद्यालय शाळा गल्ली ते झुरुळे गोपीनाथ गल्ली या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र गणेश मंदिर जवळ गणेशपार येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – गंगाधर जगतकर - 9561205930

प्रभाग क्र.5) सावता माळी मंदिर परिसर, संत नरहरी महाराज मंदिर परिसर,गंगासागर नगर,किर्ती नगर ,सिद्धेश्वर नगर ,कृष्णा नगर, जि प कन्या शाळा परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र श्रीसंत नरहरी महाराज मंदिर जवळ असणार आहे. संपर्क अधिकारी – परशुराम शिंदे - 9767428180

प्रभाग क्र.6) पद्मावती गल्ली,इंदिरानगर परिसर, जाजूवाडी, रहमत नगर, पद्मावती गल्ली, खाडीनाला परिसर,आनंदनगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र हनुमान मंदिर जवळ पद्मावती गल्ली येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – पंडीत कुलकर्णी - 9822089856

प्रभाग क्र.7) भिमवाडी परिसर,जुने रेल्वे स्टेशन, कुरेशी नगर,काकर मोहल्ला,अंबाजोगाई वाडा,सुभाष चौक या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र सुभाष चौक येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – सुरेश वाल्मीकी - 9860475237

प्रभाग क्र.8) सिद्धार्थ नगर,गौतम नगर परिसर,आझाद नगर, फुलेनगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र एस.के.हाॕटेल येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – महेश बोटुळे - 8483005676

प्रभाग क्र.9) शिवाजीनगर थर्मल परिसर, आंबेडकर नगर, अशोक नगर, गँगमन कॉटर, रेल्वे पोलीस स्टेशन, रेल्वे दवाखाना, इराणी वस्ती,आश्रम शाळा परिसर,नागसेन नगर,रेस्ट हाऊसच्या पाठीमागील परिसर,वाल्मिकी नगर,एक मिनार मज्जित पाठीमागील परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र ओव्हर ब्रिज जवळ बेग टाइल्स येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – दशरथ जगतकर - 7020613268

प्रभाग क्र.10) डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर परिसर, जलालपूर,सोमेश्वर नगर ,शारदानगर ,माधवबाग, कंडक्टर कॉलनी, इरिकेशन कॉलनी, पंचशील नगर,बॕक कॉलनी,डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर पाठीमागील परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र शिवाजी चौक येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – मुक्ताराम घुगे - 9420966054

प्रभाग क्र.11) विद्या नगर,एरिकेशन कॉलनी परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर,जिरगे नगर,प्रिया नगर, माणिक नगर परिसर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र गजानन महाराज मंदिर जवळ असणार आहे. संपर्क अधिकारी – सत्यवान रोडे - 9922746916

प्रभाग क्र.12) कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर,पोस्ट ऑफिसच्या दक्षिण बाजू,मोंढा मार्केट टेलर लाईन मोंढा आडत लाईन भाजी मार्केट,विवेकानंद नगर, हिंद नगर,गुरुकृपा नगर हालगे गल्ली,स्वाती नगर, ओपळे गल्ली, गांधी मार्केट हमालवाडी या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती हनुमान मंदिर जवळ मोंढा मार्केट येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – सय्यद खयुम - 9623515429

प्रभाग क्र.13) औद्योगिक वसाहत परिसर,पंचवटी नगर,हाउसिंग सोसायटी,घरणीकर रोड, औद्योगिक वसाहत परिसर,बाजीप्रभू नगर माणिक नगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र जगमित्र नागा मंदिर जवळ असणार आहे. संपर्क अधिकारी – रमेश मुंडे - 7020943902

प्रभाग क्र.14) पेठ मोहल्ला,सुरेश्वर मंदिर परिसर, जुने बालाजी मंदिर परिसर,देशमुख वाडा,भुई गल्ली, राजपूत गल्ली, पेठ गल्ली, देशमुख पार, वाकडे गल्ली या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र देशमुखपार येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – व्ही. बी. दुबे - 9028034253

प्रभाग क्र.15) अंबवेस/ नांदूरवेस परिसर,प्रबुद्ध नगर, कालरात्री देवी मंदिर पाठीमागील परिसर, चुकार गल्ली, नांदूरवेस, जमालपुरा, बंगला गल्ली,राजगल्ली, मुजावरवाडा, हनुमान नगर, आयेशा कॉलनी,राहूल नगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र  हनुमान नगर चौक चांदापूर रोड येथे असणार आहे. संपर्क अधिकारी – संघानंद कांबळे - 9921769915

प्रभाग क्र.16) वैद्यनाथ  मंदिर, मलीकपुरा, माणिक नगर परिसर ,वडारवाडा कॉलनी, हबीबपूरा,पावर हाउस, मलिकपुरा, पोलीस कॉलनी, माणिकनगर, इंडस्ट्रीज एरिया या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र पंचायत समिती जवळ असणार आहे.  संपर्क अधिकारी – विजयकुमार कांबळे - 8208398617

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या