💥गॅस एजन्सीधारकांनी होम डिलेव्हरी चार्जेस न घेता मुळ किंमतीतच गॅस सिलेंडर घरपोच द्यावेत जिल्हा पुरवठा विभागाचे आदेश....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश,सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा💥

परभणी : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा. आँचल गोयल मॅडम, जिल्हाधिकारी, परभाणी यांची भेट घेऊन त्यांना दि.३१/०८/२०२१ रोजी निवेदन सादर करुन जिल्ह्यातील घरगुती एल.पी.जी. गॅस एजन्सीद्वारे होम डिलेव्हरीच्या नावाने सुरु असलेली ग्राहकांची लुट थांबवुन पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्देशानुसार मुळ किमतीत डिलेव्हरी चार्जस न घेता घरपोच एल पी.जी गैस सिलेंडर पुरविणे सक्तीचे करणे तसेच जिल्हयातील सर्व गॅस एजन्सीधारकांना एजन्सीच्या दर्शनी भागावर व गॅस डिलेव्हरी करणाऱ्या वाहनांवर मुळ किमतीमध्येच गॅस सिलेंडर घरपोच देण्यात येते व अतिरिक्त शुल्क आकरणी केली जात नसल्याबाबत सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी केली होती. मा जिल्हाधिकारी मॅडम, परभणी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले होते. 


त्यानुसार दि .०३/०९ /२०२१ रोजी मा. मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्या कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी शिस्ट मंडळाची व मा. पुरवठा अधिकारी याची बैठक होऊन त्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मा जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व तिन्ही मागण्या तात्काळ मान्य करत त्याच दिवशी म्हणजे दि ०३/०९ /२०२१ रोजी जिल्हयातील सर्व गॅस एजन्सीधारकांना एक आदेश काढुन गॅस एजन्सी धारकांकडुन होम डिलेवरीच्या नावाने अतिरिक्त शुल्क आकारणी तत्काळ थांबवून या बाबत तात्काळ खुलासा मागितला असुन गॅस एजन्सीच्या दर्शनी भागावर व डिलेव्हरी व्हॅनवर एल.पी.जी. गॅसचे निर्धारीत मूल्य हे घरपोच सेवेसह आहे व कुठल्याही प्रकारचे डिलेव्हरी चार्जेस आकारले जात नाहीत असा सूचना फलक संबंधीत आदेश पत्र मिळाल्याच्या दिवसाच्या आत लावण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत एक प्रसिध्द पत्रक काढुन ( प्रेसनोट ) जिल्हयातील एल.पी.जी. गॅस धारकांना गॅस एजन्सी व एल.पी.जी. सिलेंडर वाहतुक करणाऱ्या डिलेव्हरी बॉयकडे कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न देता मुळ रक्कमच घेण्या बाबत आवाहन केले आहे. त्याच बरोबर गॅस एजन्सीचे डिलेव्हरी कॅन अतिरिक्त शुल्क आकारीत असेल तर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या या धडक कार्यवाही व होम डिलिव्हरी चे अतिरिक्त शुल्क अकरणाऱ्या गॅस एजन्सी वर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्या नंतर प्रहार जनशक्ती पक्षाने जाहीर केलेले गॅस एजन्सीला टाळे ठोको आंदोलन मागे घेतले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या भुमिकेमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अंक्शन मोडमध्ये आले असुन होम डिलेव्हरीच्या नावाने अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या गॅस एजन्सी धारकांच्या मनमानी कारभाराला लगाम बसणार असून सामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे. मा . जिल्हा पुरवठा अधिकारी , परभणी यांच्या सोबत झालेल्या चर्चमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आधाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल प्रमुख शाम भोग, वैभव संघई इत्यादी सहभाग झाले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या