💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश गिनगिणे यांचा सत्कार...!


💥महामारी संकट काळात रुग्णांना अतिशय चांगली सेवा दिल्या बद्दल के.के.फुड प्रॉडक्ट्सच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्कार💥

पुर्णा ; तालुक्यातील धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश गिणगीने यांनी कोरोना महामारी संकट काळात रुग्णांना अतिशय चांगली सेवा दिली यासोबतच वेळोवेळी उपाययोजना व काळजी घेण्याबाबत जनजागृती केल्यामुळे धानोरा काळे परिसरात रुग्णांची संख्या कमी झाली होती. परिसरातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात दखल करून घेण्यासाठी मदत केली, बऱ्याच रुग्णांना धीर देत त्यांच्याच  घरी स्वतः औषध उपचार करून मोठा धीर दिला त्याबद्दल के.के.फुड प्रॉडक्ट्स च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी के.के.फूड चे  संचालक कृष्णा काळे,पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप चे संस्थापक तथा उद्यानपंडित प्रताप काळे,प्रमोद काळे,गजानन काळे,रमेश काळे,गजानन कदम,रणजित काळे आदी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या