💥तालुक्यातील रस्ते,माहामार्गही पाण्याखाली ; गोदावरी नदी पात्राबाहेर,शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान💥
✍🏻किरण घुंबरे पाटील
परभणी (दि.०८ सप्टेंबर ) - जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात गेली दोन दिवसा पासुन सातत्याने अतीवृष्टी होत आहे. मंगळवारी दुपारी पावने दोन ते साडेचार पर्यंत ढगफुटी सारखा पाऊस चार ही मंडळात झाल्याने शेतांना तळ्याचे,तर रस्ते,महामार्गांना नद्यांचे स्वरुप आले होते.यात खरीपातील कापुस, सोयाबीन, तुर या पिकांचे मोठे नुकसान होऊन जमिनि खरडल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील राष्ट्रीय महामार्गावरुन गुडघाभर पाणी वाहात होते.व्यापा-यांच्या दुकानात ही पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले,तर जुन्या शहरातील नाला मर्यादा सोडून वाहत असल्याने अनेकांचे नुकसान झाले.
पाथरी-विटा-सोनपेठ रस्त्याला नदिचे स्वरुप प्राप्त झाले होते,पाथरी-वाघाळा-सोनपेठ मार्ग सोमवारी मध्यरात्री पासुन वाघाळा नदि पुलावर पाणी असल्याने बंद होता.एकदरीतच संपुर्ण तालुक्यात पावसाने कहर केल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.रेणापुर, हातगावात घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान झाल्या माहिती आहे.हादगावात तीन शेतक-यांचे कापसाचे पिक वाहुन जात जमिनी ही खरडल्या.रेणापूर गावाजवळील नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी पाथरी पोखर्णी रोड वर पाणी आले. यामध्ये दोन मोटोरसायकल वर जाणारे परभणी येथील तरुण पुरात वाहून जात होते, गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे या दोन युवकांना वाचवले. त्या मधील एक तरुण पाण्यात बराच पुढे जाऊन झाडाला अडकला, गावातील तरुण ज्ञानेश्वर गायकवाड,गजानन गोरे,शंकर साबळे यांच्या धाडसामुळे अडकलेल्या तरुनांचे प्राण वाचवता आले गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप टेंगसे, दिपक टेंगसे, संग्राम गायकवाड, कृष्णा टेंगसे, गणेश वारूळे आणि तहसीलदार व पोलीस स्टेशन,फायर ब्रिगेड ला माहिती दिली. यावेळी तहसीलदार निळे व पोलीस कर्मचारी ,फायर ब्रिगेड यांनी भेट दिली.
गोदावरी पात्राबाहेर :-
तालुक्यातील जवळपास १८ गावे गोदावरी नदि पात्रा शेजारी आहेत. दर तासाला पाणी वाढत असल्याने लिंबा, पाटोदा गं की,नाथ्रा अशा काही गावातील तरुणांनी रात्र जागुन काढत सोशल मिडीयातुन गावच्या परिस्थितीची माहिती दिली. गोदावरी नदि काठा वरील पाटोदा गं की या जुन्या गावाला गोदावरी नदीच्या पाण्याने पुर्णत: वेढा दिला असुन,मुदगल,विटा,नाथ्रा,गोपेगाव रामपुरी,रत्नेश्वर या गावा जवळ नदी पात्राबाहेर वाहत आहे.माजलगाव धरणातुन प्रतिसेकंद ८०५९० क्युसेस चा विसर्ग आणि मंगळवारी सायंकाळ पर्यंत पडलेल्या या पावसाने गंभिर स्थिती निर्माण केली असुन अजुन दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज सांगिला असल्याने नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 टिप्पण्या