💥महाराष्ट्र राज्यात बटाट्याची प्रचंड आवक ; उत्तरेतील राज्यांकडून पुरवठा...!


💥आवकच्या तुलनेत बाजारात बटाट्याला फारशी मागणी नसल्याने बटाट्याचे दर प्रतिकिलो २० ते २५ रुपये असे झाले💥

पुणे/ ठाणे : उत्तरेकडील राज्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी शीतगृहात साठविलेला बटाटा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे बटाट्याची मोठी आवक होत असली तरी आवकेच्या तुलनेत बाजारात बटाट्याला फारशी मागणी नसल्याने बटाट्याचे दर प्रतिकिलो २० ते २५ रुपये असे झाले आहेत शीतगृहांबरोबर केलेले करार संपत आल्यामुळे तेथील बटाटा बाजारात पाठवण्यास सुरुवात झाली आहे. 

किरकोळ बाजारात एक किलो बटाट्याची विक्री प्रतवारीनुसार ४० ते ६० रुपये किलो या दराने केली जात होती गेल्या महिनाभरापासून बटाट्याच्या भावात घट होत आहे घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला प्रतवारीनुसार १० ते १३ रुपये असा दर मिळत आहे उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून मागणीअभावी बटाट्याचे दर यापुढील काळात वाढण्याची शक्यता नाही, 

असे श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले उत्तर प्रदेशातील आग्रा, तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील इंदूर भागात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते सध्या येथील बाजारात दररोज ३० ते ४० गाड्यांमधून बटाटा विक्रीस पाठविला जात असून एका गाडीत साधारणपणे आठशे ते एक हजार किलो बटाटा असतो मागणीच्या तुलनेत बटाट्याची आवक मुबलक होत आहे. 

💥अपेक्षित मागणी नाही ;-

करोनाच्या संसर्गामुळे उपाहारागृह तसेच खाणावळ चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे विवाह समारंभातील उपस्थिती तसेच खासगी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद आहेत त्यामुळे बटाट्याला अपेक्षेएवढी मागणी नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या